देश विदेश

Vijay Thalapathy: सुपरस्टार विजयची राजकारणात धमाकेदार एण्ट्री; नागरिकांना घातली भावनिक साद, सभेची गर्दी पाहून व्हाल अवाक्

Vijay First Political Speech: तमिळ सुपरस्टार विजय थलपथीने अखेर राजकारणात प्रवेश केला. आपल्या पहिल्या राजकीय भाषणात त्याने नागरिकांना भावनिक साद घातली. पक्षाच्या सभेला हजारो लोकांनी हजेरी लावली होती.

Bharat Jadhav

अखेर तामिळ सुपरस्टार विजयने राजकारणात प्रवेश केला. रविवारी पहिल्याच जाहीर सभेत त्याने समर्थकांना संबोधित केलं. यावेळी त्याने नागरिकांना भावनिक साद घातली. विजय यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि टीव्हीकेचा ध्वज फडकावून सभेची सुरुवात केली.

यावेळी विजयने सांगितले की, आपण आपली सुवर्ण चित्रपटसृष्टीतील कारकीर्द आणि प्रचंड कमाई सोडून जनतेच्या सेवेसाठी राजकारणात प्रवेश केलाय. आपल्या चाहत्यांच्या पाठिंब्यानेच आपण येथे आहोत, असे विजयने सभेत सांगितंल. विजयने आपल्या पहिल्या भाषणात राजकारणाचे वर्णन सिनेमा नसून रणांगण म्हणून केले. गांभीर्याने आणि थोडा विनोदबुद्धीने विचार केला तरच राजकारणात टिकून राहणे शक्य असल्याचे विजय यावेळी म्हणाला.

द्रविड राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करा

शेकडो समर्थकांच्या गर्दीत विजय म्हणाला की, त्यांचा पक्ष तमिळ आणि द्रविड राष्ट्रवादाला समान महत्त्व देईल. TVK कोणत्याही जाती किंवा धर्मापुरते मर्यादित राहणार नाही. सर्वसमावेशक सामाजिक न्यायाच्या विचारसरणीवर काम करेल. प्रत्येकासाठी सर्व काही” हे TVK चे उद्दिष्ट आहे. जे राज्यातील नागरिकांना समान संधी आणि संसाधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल, असं विजय म्हणाला.

आपल्या भाषणात विजयने करुणानिधी यांच्या राजकारणावर टीका केली. आपल्या भाषणात विजयने द्रविडी राजकारणावर ताशेरे ओढले करुणानिधींचे मॉडेल 'जनविरोधी' असल्याचं टीका त्याने केली. या मॉडेलच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे तो म्हणाला. TVK तामिळनाडूच्या राजकारणाला एका नवीन दिशेला घेऊन जाईल. इतर पक्षांचा समावेश करून मित्रपक्षांना सत्तेतील हिस्सेदारी सुनिश्चित करेल, असा विजयला विश्वास आहे.

महिला पक्षाच्या 'वैचारिक मार्गदर्शक' आहेत. आपण केवळ शब्द नाही तर ठोस कृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे टीव्हीकेमध्ये महिलांच्या सहभागाला चालना दिली जाईल, जेणेकरून महिलांना राजकीय नेतृत्वातही पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल, असंही विजय यावेळी म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT