Sunita Williams returns to Earth  Saam Tv News
देश विदेश

Sunita Williams : बेबी फिट, ग्रॅव्हिटी सिकनेस, अन्...; पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्स यांना कोणत्या अडचणी भेडसावणार?

Sunita Williams News : अंतराळातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्स यांना चालण्याची आणि फिरण्याची समस्या भेडसावू शकते. अंतराळात अंतराळवीरांना चालावे लागत नाही.

Prashant Patil

वॉशिंग्टन : अंतराळवीर सुनीता विल्यम्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवर सुरक्षित परतल्या आहेत. सुनीता विलियम्स यांचं अंतराळातील मिशन केवळ आठवड्याभराचं होतं. पण त्या ९ महिने अंतराळात अडकल्या होत्या. अखेर आज त्या सुखरुपपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. अंतराळात ९ महिने मुक्काम केल्याने आता सुनीता विलियम्स यांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या भेडसावणार आहेत.

अंतराळातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विलियम्स यांना चालण्याची आणि फिरण्याची समस्या भेडसावू शकते. अंतराळात अंतराळवीरांना चालावे लागत नाही. या दरम्यान त्यांच्या तळपायाच्या त्वचेचा बराचसा भाग नाहीसा होतो. अंतराळवीर बऱ्याच कालावधीनंतर पृथ्वीवर परत येतात, तेव्हा त्यांचे तळवे लहान मुलांच्या तळपायांसारखे नरम आणि कोवळे झालेले असतात. त्यामुळे त्यांना चालताना अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येला 'बेबी फिट' म्हटलं जातं. याआधी विविध अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यानंतर बेबी फिटची समस्यांना सामोरे जावं लागलं आहे.

अंतराळात गुरुत्वाकर्षण मुळीच नाही. त्यामुळे बराच काळ गुरुत्वाकर्षाशिवाय राहिल्याने अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर इथल्या परिस्थितीप्रमाणे स्वत:ला जुळवून घ्यावं लागतं. गुरुत्वाकर्षण रक्त आणि अन्य द्रव पदार्थांना शरीराच्या खालील भागात खेचतं. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यानं हे द्रव पदार्थ अंतराळवीरांच्या शरीराच्या वरील भागात जमा होतात. त्यामुळेच अंतराळवीरांचं शरीर फुललेलं दिसतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT