Blast In caandle factory Saam Tv
देश विदेश

Pakistan Blast News : ईदच्या दिवशी बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरलं; DSPसह ५२ जणांना मृत्यू, १३० जण जखमी

प्रविण वाकचौरे

Pakistan Blast News :

पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील मशिदीजवळ शुक्रवारी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 52 जणांचा मृत्यू झाला, तर 130 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी लोक जमत असताना हा हल्ला झाला. डीएसपी नवाज गिश्कोरी यांच्या कारजवळच हा स्फोट झाला. (Crime News)

जिओ न्यूजच्या माहितीनुसार, या हल्ल्यात डीएसपी नवाज गिश्कोरी यांचा देखील मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गरज पडल्यास जखमींना कराचीलाही हलवण्यात येईल. जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल.  (Latest Marathi News)

अचकझाई पुढे म्हणाले की, आमच्या शत्रूंना विदेशी शक्तींच्या मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून शांतता बिघडवायची आहे. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. बलुचिस्तानमधील सरकारी मंत्री आणि इतर अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT