<div class="paragraphs"><p>'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या 'बाबा' यांचा आत्महत्येचा प्रयत्न !</p></div>

'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या 'बाबा' यांचा आत्महत्येचा प्रयत्न !

 

SaamTv

देश विदेश

'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या बाबांचा आत्महत्येचा प्रयत्न !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : 'बाबा का ढाबा' Baba Ka Dhaba चालवणारे दिल्लीतील Delhi मालवीय नगरमध्ये कांता प्रसाद यांनी आत्महत्या Suicide करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना तातडीने दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी हा अचानक असा आत्महत्येचा प्रयत्न का केला ? यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दिल्ली पोलिस Police या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Suicide Attempted by Kanta Prasad who runs Baba Ka Dhaba in delhi

दिल्लीतील बाबा का ढाबा चालवणाऱ्या ८१ वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बादामी देवी या दोघांचे नशीब एक व्हायरल Viral झालेल्या व्हिडिओमुळे पूर्णतः पलटून गेले होते. सोशल मीडिया ट्विटरवर Twitter ते टॉप ट्रेंड हॅशटॅग मध्ये होते. इतकंच नवे तर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांच्या ढाब्याबाहेर लोकांच्या अक्षरशः लांब लांब रंग पाहायला मिळाल्या होत्या. लॉक डाऊन मुळे वाईट परिस्थिती त्यांना अनेकांनी त्यांना आर्थिक मदतही केली होती. यातूनच कांता प्रसाद यांनी मिळालेल्या मदतीचं हॉटेल सुरू केले होते.

कांता प्रसाद यांचे हॉटेल फेब्रुवारी महिन्यात बंद झाल होत. त्यामुळे नुकतेच ते पुन्हा आपल्या ढाब्यामध्ये परतले आहेत. परंतु त्यांची लोकप्रियता फार काळ टिकून राहिली नाही. तसेच लॉक डाऊन मुळे आता आधीसारखी कमाई होत नाही. दिल्लीतील लॉकडाऊनचा त्यांना चांगलाच फटका त्यांना बसला होता. त्यामुळे, आता पुन्हा त्यांना गरीबीचा सामना करावा लागत आहे. 'लॉकडाऊन संकटामुळे आमची दैनंदिन कमाई ३,५०० रुपयांवरुन कमी होऊन १००० रुपयांवर आली आहे. हे कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसं नाही', असे त्यांचे बोल काही दिवसांपूर्वीच ऐकण्यात आले होते.

कांता प्रसाद यांचं रेस्टॉरंट फेब्रुवारीमध्ये बंद झालं आहे. आता ते पुन्हा आपल्या ढाब्याकडे परतले आहेत. मात्र, आता आधीसारखी कमाई होत नाही. दिल्लीतील लॉकडाऊनचा फटका त्यांना बसला होता. त्यामुळे, आता पुन्हा एकदा त्यांना गरीबीचा सामना करावा लागत होता. 'लॉकडाऊनमुळे आमची दैनंदिन कमाई ३५०० रुपयांवरुन घटून १००० रुपयांवर आली आहे. हे कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसं नाही', अशी त्यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती.

भारतीय यू-ट्यूबर You Tuber गौरव वासन याने काढलेल्या व्हिडीओमुळे बाबा का ढाबा लोकप्रिय झाला होता. वासननं ढाब्याच्या व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. मात्र, थोड्याच कालावधीत कांता प्रसाद यांनी वासन आणि त्याच्या सहकार्यांवर दान म्हणून मिळालेल्या पैशाचा दुरुपयोग आणि फसवणुकीची बद्दल तक्रार Crime दाखल केली होती.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT