Sudan Clash  Saam TV
देश विदेश

Sudan Clash : सुदानमध्ये गोळीबारात मृतांची संख्या १८० वर; भारतीय दुतावासाच्या मार्गदर्शक सूचना जारी

संघर्षांच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय दुतावास मार्फत एक मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Sudan News : सुदानची राजधानी खार्तुममध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरली आहे. सुदान सैन्य आणि बंडखोर निमलष्करी दल यांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. या हिंसाचारात सामान्या नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १८० च्या घरात पोहचली आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. संघर्षांच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय दुतावास मार्फत काही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. (Crime News)

खार्तुममध्ये जीवितहानी वाढत आहे. त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांनी कृपया आपली सुरक्षा घेत घराबाहेर पडूने टाळावे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते त्यामुळे भारतीयांनी आपल्या खान्यापिण्याच्या वस्तूंचा साठा करुन ठेवावा. तिथे असलेल्या अन्य शेजाऱ्यांची मदत घ्यावी. घरीच रहा आणि सुरक्षित रहा, अशा सूचना दुतावासांनी दिल्या आहेत.

गृहयुद्धात मृत्यू झालेले भारतीय कोण होते?

सुदान गृहयुद्धात काही दिवसांपूर्वी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाचे नाव अल्बर्ट ऑगस्टीन असे आहे. सुदानमधील भारतीय दूतावासाने ट्वीट केले की, "अल्बर्ट ऑगस्टीन हे सुदानमधील एका कंपनीत काम करणारे भारतीय नागरिक आहे. काल गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. पुढील व्यवस्था करण्यासाठी कुटुंब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.”

सुदानमध्ये नेमकं काय घडलंय?

उत्तर अफ्रिका खंडातील सर्वात मोठ्या अरब देशांमध्ये सुदान हा एक आहे. या देशाची राजधानी खार्तुममध्ये गेल्या काही दिवसांपासून निलष्करी दलाच्या जवानांमध्ये आणि लष्करी सैन्यात गोळीबाराच्या घटना सुरु आहेत. आत्तापर्यंत या हिंसाचारात १८० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT