Snake Saam TV
देश विदेश

Success Story: साप चावल्याने मृत्यू का होतो? ६ हजारांहून अधिक जणांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याने सांगितली महत्वाची गोष्ट

Vishal Gangurde

Success Story:

भारतात दरवर्षी साप चावल्याने कमीत कमी ६४००० हजार जणांचा मृत्यू होतो, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना साप चावण्याचा धोका अधिक असतो. मात्र, डॉक्टर सदानंद आणि त्यांची पत्नी पल्लवी राऊत हे साप चावलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत ६ हजाराहून अधिक जणांचे जीव वाचवले आहेत. (Latest Marathi News)

'नवभारत टाइम्स'च्या वृत्तानुसार, पुण्याच्या उमब्रज गावातील डॉ. सदानंद राऊत हे १९९२ साली 'जनरल मेडिसिन'मध्ये पदवी उत्तीर्ण झाले. सदानंद राऊत यांनी आदिवासी बहुल भागातील खेडे गावात प्रॅक्टिस सुरु केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदिवासी बहुल भागात रुग्णसेवा करण्यास सुरुवात का केली?

एकदा त्यांच्या मित्राच्या शेतात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने फोन करून कळवले की, त्यांच्या मुलीला सापाने चावा घेतला. सापाने चावललेल्या भागावर त्या मुलीला प्रचंड वेदना होऊ लागल्या.

तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला तातडीने रुग्णालयात आणण्यासाठी सांगितलं. मात्र , मुलीला रुग्णालयात आणेपर्यंत तिचा मृत्यू झाला. ही मुलगी फक्त ८ वर्षांची होती.

या घटनेनंतर राऊत दाम्पत्यांनी निर्णय घेतला की, गावात एकही व्यक्तीला सापाने चावल्यानंतर मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही. त्यानंतर या डॉक्टर दाम्पत्यांनी गावात प्रॅक्टिस सुरु करण्याचा निर्णय घेतला . जे शेतकरी शेतात सोयाबीन, शेंगा, ऊसाची लागवड करतात. त्या शेतकऱ्यांना सापाचा सामना करावा लागतो.

भारतात कॉमन क्रेट, भारतीय कोबरा, रसेल वायपर आणि सॉ स्केल्ड वायपर या सारखे विषारी साप चावल्यामुळे लोकांचा मृत्यू होतो. या प्रकारचे साप चावल्यानंतर अँटी-वेनम देण्यास उशीर झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होतो.

साप चावल्यावर काय करावं?

डॉ. सदानंद राऊत यांच्यानुसार, साप चावल्यानंतर रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात आणायलं हवं. रुग्णाला रुग्णालयात डॉक्टर आणि अँटीवेनम उपलब्ध आहेत का, याची खातरजमा केली पाहिजे. 'नीम-हकीम'कडे जाऊन वेळ वाया घालवू नका. शरीरावर साप चावललेल्या भागावर चावू किंवा बांधू नये.

साप चावल्याने लोक घाबरू लागतात. मात्र, त्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो. साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की, घाबरण्याचं काहीच कारण नाही, अशी समजूत काढली पाहिजे. साप चावल्यानंतर व्यक्तीने चालू किंवा धावू नये. त्यामुळे सापाचं विष हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचण्याची भीती असते. तसेच साप चावल्यानंतर रुग्णाने तातडीने रुग्णालय गाठलं पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT