Rajasthan Crime News Saam TV
देश विदेश

Rajasthan Crime News: राजस्थानच्या 'कोटा'त लातूरच्या तरुणाची आत्महत्या, २४ तासात २ विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं

Student Jumps on Building 6th Floor: अवघ्या १७ व्या वर्षी तरुणाने टोकाचं पाऊल नेमकं का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Ruchika Jadhav

Rajasthan Kota:

राजस्थानच्या कोटा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे नीटची तयारी करणाऱ्या एका मुलाने आत्महत्या केली आहे. सदर घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबावर दु:खाचं सावट आलं आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर येथील अविष्कार संभाजी कासले असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. पेपर संपल्यानंतर तो कोचिंग क्लाससमोर असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेला आणि खाली उडी घेत आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तरुणाने टोकाचं पाऊल नेमकं का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

आविष्कारने उडी घेतल्यावर त्याता तात्कळ रुग्णालात देखील दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. रविरारी आविष्कारच्या आत्महत्येच्या घटनेनंतर ४ तासांनी आणखीन एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. आदर्श राज या १८ वर्षीय विद्यार्थ्याने देखील आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श हा NEET UG परीक्षेची तयारी करत होता. त्याने रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास कुन्हाडी पोलीस ठाणे हद्दीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविष्कार काळसे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी होता. कोटा येथे तो NEET UG च्या परिक्षेसाठी आला होता. त्याचे आई बाबा एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत.

आत्महत्या केलेला दुसरा विद्यार्थी रोहतास जिल्ह्यात राहणारा होता. गेल्या एक वर्षापासून तो कोटामध्ये भाड्याच्या घरात राहत होता. इथे तो NEET UG या परीक्षेची तयारी करत होता. शिक्षणात असलेली चढाओढ यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परिणाम होत आहे. अपयश आणि नैराश्य असल्याने विद्यार्थी आत्महत्येचा निर्णय घेतायत. रविवारी झालेल्या घटनेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसले तरी परीक्षेतील अपयशामुळेच या घटना घडल्याच्या चर्चा सुरू आहेत.

राज्य सरकारने कोटाच्या कोचिंग सेंटरमध्ये नयमित चाचणी परीक्षा घेण्यावर बंदी लावली आहे. तसेच पुढील दोन महिने मुलांना मानसिक आधार आणि सुरक्षा दिली जाणार असल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे. यासाठी सलग दोन महिने नियमित होणाऱ्या चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT