Bhopal News  Saam Tv
देश विदेश

Bhopal News : काठीने मारले, खोलीत कोंडले, कोंबडा व्हायची शिक्षा; शिक्षकांच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू

Student died after teachers beaten : होमवर्क केला नाही म्हणून एका खासगी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलीय.

साम टिव्ही ब्युरो

Madhya Pradesh Student died after teachers beaten him : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. होमवर्क केला नाही म्हणून एका खासगी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलीय. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला आहे. शिक्षकाने या मुलाला १२ जुलै रोजी मारहाण केली होती. तेव्हापासून तो रुग्णालयात दाखल होता. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय आणि नातेवाइक (Relatives) प्रचंड संतापले. त्यांनी रविवारी शाळेला घेराव घातला. संबंधित शिक्षकांविरोधात कारवाई करण्यात यावी, तसेच आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले.

वडिलांवर दुःखाचा डोंगर

कृष्णा असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. त्याने होमवर्क (Home Work) केलं नाही म्हणून शिक्षकांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली, असं मुलाचे वडील कोकसिंह चौहान यांनी सांगितलं. इतकंच नाही तर, शिक्षा म्हणून कृष्णाला ३० मिनिटे एका खोलीत कोंडून ठेवले होते.

याच शाळेत त्याचा मोठा भाऊ नववीच्या वर्गात शिकतो. त्याने ही संपूर्ण घटना सांगितली. धक्कादायक म्हणजे दोन शिक्षकांनी कृष्णाला काठीने बेदम मारहाण केली, तसेच त्याला 'कोंबडा' व्हायला सांगितले होते, असंही त्याच्या भावाने सांगितलं.

मोठ्या भावानं सांगितलं, नेमकं काय घडलं?

कोकसिंह हे ग्वाल्हेरमधील बहोदापूर येथे राहतात. ते एका खासगी कंपनीत (Company) नोकरीला आहेत. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांनी सांगितले की, कृष्णा हा एकदम हसता खेळता मुलगा होता. १२ जुलै रोजी तो शाळेतून परतला. त्याला उलटी आणि हातपाय लुळे पडल्यासारखे वाटत होते.

त्याच्या मोठ्या भावानंच सांगितलं की शाळेतल्या दोन शिक्षकांनी त्याला काठीने मारलं. कोकसिंह हे तात्काळ शाळेत पोहोचले. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने कृष्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

८ महिन्यांआधीही कृष्णाला याच शिक्षकांनी मारहाण केली होती

कोकसिंह यांनी पोलिसांना सांगितले की, कृष्णाला याच शिक्षकांनी ८ महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. त्यावेळी कृष्णाला ४ दिवस ताप भरला होता. शाळेत जायला त्याला भीती वाटत होती. त्यावेळी शाळेत गेलो होतो.

संबंधित शिक्षकांनी पुन्हा माझ्या मुलाला मारहाण करू नये, असं त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं. पण कालांतरानं या शिक्षकांकडून पुन्हा माझ्या मुलाला त्रास दिला जात होतो, असा आरोपही त्यांनी केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT