Jammu Kashmir Leh Ladakh Earthquake  Saam TV
देश विदेश

Earthquake News: जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; भल्यापहाटे लोकांची पळापळ

Jammu Kashmir Leh Ladakh Earthquake: जम्मू-काश्मीर आणि लेह लडाखमध्ये मंगळवारी (२६ डिसेंबर) पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भल्यापहाटे जमीन हादरल्याने लोक रस्त्यावर आले.

Satish Daud

Jammu Kashmir Leh Ladakh Earthquake

जम्मू-काश्मीर आणि लेह लडाखमध्ये मंगळवारी (२६ डिसेंबर) पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भल्यापहाटे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी घरातील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे लोक घाबरून रस्त्यावर उतरले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, लडाखमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भूकंपाचा केंद्रबिंदू (Earthquake) कारगिलमध्ये १० किलोमीटर भूगर्भात होता. लडाखशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागात रात्री १ वाजून १० मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती. (Latest Marathi News)

याआधी २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नागालँडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. लडाखपासून काश्मीरपर्यंत आज पहाटे झालेल्या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. गेल्या महिन्याभरापासून जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

भूकंप झाल्यास काय करावे? काय करू नये?

  • तुम्ही इमारतीच्या आत असाल तर जमिनीवर बसा आणि मजबूत फर्निचरखाली जा.

  • जर टेबल किंवा फर्निचर नसेल तर आपला चेहरा आणि डोके हाताने झाकून खोलीच्या एका कोपऱ्यात बसा.

  • जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर, इमारतीपासून, झाडे, खांब आणि तारांपासून दूर जा.

  • तुम्ही वाहनात प्रवास करत असाल, तर लवकरात लवकर वाहन थांबवा आणि वाहनात बसून राहा.

  • जर तुम्ही ढिगाऱ्याखाली गाडले गेले असाल, तर हालचाल करू नका. कोणत्याही पाईप किंवा भिंतीवर हलके टॅप करा.

  • जेणेकरून बचाव कर्मचार्‍यांना तुमची परिस्थिती समजू शकेल. तुमच्या घरात आपत्ती निवारण किट नेहमी तयार ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam TV Exclusive : अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न, तज्ज्ञ काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: हरवलेली आणि अपहरण झालेली मुले..., सोशल मीडियावरील अफवांवर मुंबई पोलिसांचा खुलासा

Budget 2026: DMart तर ऐकलंय; पण She-Mart म्हणजे नेमकं काय रे भाऊ? ग्रामीण महिलांसाठी ठरणार वरदान

माझी इच्छा पूर्ण कर...! विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नागपुरमधील धक्कादायक प्रकार

Kitchen Tips: बटाटे फ्रिजमध्ये का ठेवू नये?

SCROLL FOR NEXT