Chhatrapati Shivaji Maharaj Saam Tv
देश विदेश

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला; असा झाला चोरीचा उलगडा

शिवजयंती पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सापडल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Shivani Tichkule

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Stolen : गेल्या महिन्यात कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली होती. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून तो चोरण्यात आला होता. तर, या पुतळ्याचा भाग असलेला अश्वच्या पायांकडील भाग तसाच होता. दरम्यान, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला हा पुतळा अखेर सापडला आहे.

अमेरिकेतील (America) एका भंगार दुकानात हा पुतळा सापडला आहे. संतापजनक बाब म्हणजे, या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचं वजन सुमारे 200 किलो इतकं आहे. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन होजे शहराला 1999 सालात पुणे (Pune) शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता.

31 जानेवारी रोजी या पुतळ्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अखेर हा पुतळा अमेरिकेतल्या एका भंगाराच्या दुकानात सापडला. हे दुकान अवैध कामांसाठी ओळखले जाते. या दुकानातील ३ कर्मचाऱ्यांनी हा पुतळा या ठिकाणी आणल्याची माहिती पोलिसांना (Police) दिली आहे. त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला होती.

या तिघांनी 29 जानेवारी रोजी हा पुतळा चोरला होता. 9 फेब्रुवारी रोजी हा पुतळा या दुकानात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली आणि पुतळा हस्तगत केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, शिवजयंती (shiv jayanti 2023) पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सापडल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT