Dal Lake fire /PTI SAAM TV
देश विदेश

Dal Lake fire : प्रसिद्ध 'दल सरोवर' मध्ये भल्या पहाटे आगीचं तांडव; पर्यटकांसाठीच्या हाऊसबोट जळून खाक

houseboats fire in Dal Lake : श्रीनगरमधील प्रसिद्ध 'दल सरोवर'मध्ये शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत पाच हाऊसबोट जळून खाक झाल्या.

Nandkumar Joshi

Srinagar's Dal Lake Fire :

श्रीनगरमधील प्रसिद्ध 'दल सरोवर'मध्ये शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत पाच हाऊसबोट जळून खाक झाल्या. सरोवराच्या घाट क्रमांक ९ वर असलेल्या एका हाऊसबोटमध्ये आग लागली. ही आग वेगाने पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या चार हाऊसबोटींनाही आग लागली.

या आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक वृत्तानुसार, शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. तत्पूर्वी या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग नियंत्रणात आणली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दल सरोवरमधील हाऊसबोटींना लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर हाऊसबोटींचं प्रचंड नुकसान झालं असून, ते कोट्यवधींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. घटना घडली त्यावेळी सुदैवाने बोटीत कुणीही नव्हतं.

दल सरोवर पाहण्यासाठी गेलेले पर्यटक हाऊसबोटीतूनच फिरतात. पर्यटकांमध्येही या बोटींचं प्रचंड आकर्षण असते. या बोटींची बांधणीही खास पद्धतीने केली जाते. श्रीनगरमधील हे दल सरोवर बघण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

हे जम्मू -काश्मीरमधील पर्यटनाचे मुख्य केंद्रबिंदू मानले जाते. याच ठिकाणी हाऊसबोटींना आग लागल्यानं पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT