Spain Train Accident Death Toll And Rescue Operation Latest News saamtv
देश विदेश

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांची धडक, ४६ जणांचा मृत्यू

Major Rail Accident in Spain: स्पेनमध्ये दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांची एकमेकांना धडक झाली. स्पॅनिश अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Bharat Jadhav

स्पेनमधील टोलेडो प्रांताजवळ दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. आज सकाळी मध्य स्पेनमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघतात आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत. या अपघाताबाबत स्पॅनिश प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिलाय. स्पेनचे रेल्वे जाळे व्यवस्थापित करणाऱ्या 'एडीआयएफ' (ADIF) या कंपनीने या अपघाताची माहिती देताना सांगितले की, बुधवारी सकाळी टोलेडो प्रांतात ही दुर्घटना घटना घडली.

अपघातानंतर लगेचच माद्रिद, स्युदाद रियाल आणि आंदालुसिया दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आलीय. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आणि रेल्वे मार्ग सुरक्षित असल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत या मार्गांवर कोणतीही रेल्वे धावणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

सरकारी वृत्तवाहिनी संस्था 'टीव्हीई' च्या वृत्तानुसार, दोन्ही रेल्वे गाड्या एकाच दिशेने जात होत्या. एका गाडी पुढे जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेच्या मागील भागावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, एका रेल्वे गाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. बचाव पथके त्वरित घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आलेत.

उर्डाचे महापौर मॅन्युएल गालन यांनी टीव्हीईला सांगितले की, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झालेत. 'सिव्हिल प्रोटेक्शन'च्या अधिकाऱ्यांनी नगर प्रशासनाशी संपर्क साधून प्रवाशांच्या देखभालीसाठी एक क्रीडा संकुल (स्पोर्ट्स पॅव्हेलियन) तयार ठेवण्याची विनंती केलीय. स्थानिक प्रशासन सध्या जखमींना प्रथमोपचार देण्याची आणि गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करत आहे. दरम्यान, जवळच असलेल्या 'लॉस येबेनेस' गावाचे महापौर जेसुस पेरेझ यांनीही टीव्हीईशी बोलताना या अपघाताला अत्यंत गंभीर असल्याचे म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Traffic: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणामुळे नाशिकमध्ये वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर...

Maharashtra News Live Update : पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात १३ पोलिसांसह २५ जणांना अटक

अमरावती शिक्षक मतदारसंघात उलटफेर! दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये गेम फिरला, किरण सरनाईक यांचा विजय, काँग्रेसचा दारूण पराभव

पुरेशी झोप घेऊनही सकाळी सतत थकवा आणि आळस जाणवतोय? जाणून घ्या 'ही' महत्त्वाची कारणे

पुण्यात १४ पोलिसांसह २५ जणांना अटक, काय आहे प्रकरण? पोलीस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT