फ्रान्समध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लूवर म्युझियममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. दोन पर्यावरण कार्यकर्त्यांनी जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकले. पेंटिंग बुलेटप्रूफ ग्लासमध्ये सुरक्षितपणे जतन केले आहे, त्यामुळे पेंटिंगचे कोणतेही नुकसान झाले नाही. फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि दरम्यानच्या काळात हवामान कार्यकर्ते लूव्रे म्युझियममध्ये होते. आंदोलकांनी कृषी व्यवस्थेत बदल करण्याची गरज आणि निरोगी, शाश्वत अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किमती आणि नियमांचे सुलभीकरण या मागणीसाठी पॅरिसमध्ये शेतकऱ्यांच्या निदर्शनेदरम्यान ही घटना घडली.
या घटनेनंतर संग्रहालयात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत पेंटिंगला काळ्या पडद्याने झाकले आहे. मोनालिसा पेंटिंग 1950 च्या दशकाच्या सुरुवातीपासून संरक्षण काचेच्या भिंतीमध्ये ठेवण्यात आली होती. एकदा एका व्यक्तीने पेंटिंगवर ॲसिड फेकले, ज्यामुळे पेंटिंगचे नुकसान झाले. यानंतर, पुढील जतन करण्यासाठी बुलेटप्रूफ काचेमध्ये पेंटिंग बसविण्यात आली. 2022 मध्ये एका कार्यकर्त्याने मोनालिसाच्या पेंटिंगवर केक फेकून लोकांना "पृथ्वीचा विचार करा" असे आवाहन केले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1911 मध्ये लूव्रे म्युझियममध्ये चोरी झाली होती. त्यावेळच्या संग्रहालयातील कर्मचारी विन्सेंझो पेरुगियाचाही या चोरीत समावेश होता. मोनालिसा पेंटिंग 1913 मध्ये इटलीतील एका बाजारात विकण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा हे पेंटिंग जप्त करण्यात आले. चोरीमुळे आंतरराष्ट्रीय खळबळ उडाली आणि मोनालिसाच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.