crime  Saam tv
देश विदेश

भयानक! बियरच्या बाटलीत लघवी भरली अन् सोनूला पाजली, टॉर्चरचा व्हिडिओ कुटुंबाला पाठवला

Rajasthan crime news : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात भयानक प्रकार उघडकीस आला असून भोपाळच्या 18 वर्षांच्या सोनूला अपहरण करून तीन दिवस अमानुष छळ करण्यात आला. बिअरच्या बाटलीत लघवी भरून त्याला पाजण्यात आले आणि टॉर्चरचा व्हिडिओ कुटुंबाला पाठवण्यात आला.

Namdeo Kumbhar

Love affair kidnapping case : राजस्थानमध्ये क्रूरतेचा एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. भोपाळच्या १८ वर्षाच्या सोनूला जबरदस्ती लघवी पिण्यास भाग पाडले अन् बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ शूट केला अन् सोनूच्या कुटुंबाला पाठवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. सोनू हा भोपाळमधील कोलार भागातील रहिवासी आहे. मुलीसोबत प्रेमसंबंध अशल्यामुळे कुटुंबाने सोनूसोबत क्रूरता केली. ३ दिवस सोनूला बंदी बनवले, त्याला जबर मारहाण केली. बिअरच्या बॉटलमध्ये लघवी भरून त्याला पाजली. या अमानुष कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोनूच्या कुटुंबाला पाठवला. या प्रकरणात भोपाळ पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली.

राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पुलरो गावात ही घटना घडली. भोपाळमधील कोलारच्या सोनूचे अपहरण करण्यात आले होते. सोनूचे पुलरो गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. १५ दिवसांपूर्वी मुलगी घरातून पळून सोनूच्या घरी राहायला गेली होती. मुलीच्या कुटुंबाने हस्तक्षेप केल्यानंतर ती राजस्थानला परतली. पण सोनू अन् आपल्या मुलीचं प्रेमप्रकरण त्यांना रूचले नव्हते. त्यांनी सोनूला फोन करून नंतर घरी बोलवले.

मुलीच्या कुटुंबाला आपलं नातं मान्य आहे, असा सोनूचा विश्वास बसला. आलेले आमंत्रण स्विकारत सोनू भेटण्यासाठी पुलरो गावात पोहचला. त्यावेळी मुलीच्या कुटुंबियांनी त्याला किडनॅप केले अन् एका घरात ओलीस ठेवले. ३ दिवस सोनूचा अमानुष छळ केला. त्याला बेदम मारले. जेवण-पाणी दिले नाही. बिअरच्या बाटलीत लघवी भरून प्यायला दिली. या सगळ्या प्रसंगाचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केले अन् सोनूच्या कुटुंबियांना पाठवले. सोनूच्या कुटुंबांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली.

३ दिवस सोनूला बेदम मारहाण करण्यात आली. लाथा-बुक्क्या अन् काठीने मारले गेले. मुलीसोबतचे नाते विसरून जा म्हणून धमक्या देण्यात आल्य. शारीरिक छळाव्यतिरिक्त सोनूला मानसिकदृष्ट्या तोडण्यासाठी आणि अपमानित करण्यासाठी त्याला लघवी पाजली. याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून कुटुंबाला पाठवले. हे भयानक व्हिडिओ पाहून भोपाळमधील सोनूच्या कुटुंबियाची पायाखालची जमीनच सरकली. सोनूच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. भोपाळ पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने सोनूची सुटका केली. व्हिडिओची सत्यता पडताळली जात आहे. आरोपींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रोज एक पेरु खाल्याने होतील आर्श्चयकारक फायदे, जाणून घ्या

Thane Mayor politics: शिंदे मुंबईत नडले, भाजपने ठाण्यात कोंडी केली; महापौरपदासाठी महायुतीत रस्सीखेच

Cat Behavior: मांजरी घरासमोर भांडणं करण्यामागचे संकेत काय? उत्तर वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीमध्ये उघडणार 'ती' खोली; स्पर्धकांना मिळणार 'ही' खास पॉवर

Mayor Election : उद्धव ठाकरेंना धक्का, शिदेंची गळ अन् ११ नगरसेवक नॉट रिचेबल, सत्तास्थापनेचा थरार शिगेला

SCROLL FOR NEXT