Sonia Gandhi Saam Tv
देश विदेश

Sonia Gandhi: मोठी बातमी! काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड

Satish Kengar

लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. जो एकमताने मान्य झाला आहे. यातच राहुल गांधींना लोकसभेचे विरोधी पक्षनेते करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबतचा प्रस्तावही काँग्रेसच्या बैठकीत मांडण्यात आला, जो पास झाला आहे. मात्र राहुल गांधी यांनी याबाबत अद्याप आपला निर्णय कळवलेला नाही. यातच काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची इच्छा आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावावी.

या निवडणुकीत राहुल गांधींनी ज्या आक्रमकतेने भाजपचा सामना केला आणि ज्या पद्धतीने त्यांनी मोदींना कोंडीत पकडले ते निवडणुकीच्या निकालात दिसून आले आहे, असं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत लोकसभेत काँग्रेसची विचारधारा पुढे नेण्यासाठी आता राहुल यांनी विरोधी पक्षनेते व्हावे, अशी मागणी काँग्रेस नेते करत आहेत.

मात्र राहुल गांधी यांनी अद्याप आपला निर्णय जाहीर न केल्याने काँग्रेस नेते संभ्रमात आहेत. हीच योग्य वेळ आहे, राहुल गांधींनी तातडीने निर्णय घ्यावा, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. आता राहुल गांधी काय निर्णय घेतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT