Sonam Wangchuk statement on CJP founder Abhijeet Dipke political ambitions saam tv
देश विदेश

CJP आणि अभिजीत दिपकेंबाबत सोनम वांगचुक यांनी केला गौप्यस्फोट; दीपकेंच्या मनातील बाब केली उघड

Sonam Wangchuk Major Statement On Abhijeet Dipke : मी जितका वेळ त्यांच्यासोबत आंदोलनात घालवला, तितक्या वेळ मी त्यांना एकच सल्ला दिला होता, या आंदोलनाला अजिबात राजकीय स्वरूप देऊ नका, पण.. सामजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दीपकेंबाबत मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

  • अभिजीत दिपके यांच्या राजकीय महत्वाकांक्षेवर सोनम वांगचुकांचे मोठे विधान

  • सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके राजकारणात प्रवेश करणार का

  • सोनम वांगचुक यांनी अभिजीत दिपकेंबाबत काय गौप्यस्फोट केला

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन केले होते. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवस उपोषण केले होते. दरम्यान सोनम वांगचूक यांनी एक धक्कादाय विधान केलंय. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकाऱ्यांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा असल्याचं विधान वांगचूक यांनी केलंय. प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर बोलताना सोनम वांगचुक यांनी हे विधान केलंय.

दिल्लीमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रात परतललेल्या सीजेपीचे संस्थापक दीपके यांनी पुढील भवितव्याबाबत बोलताना राजकारणातील प्रवेशाबाबत वक्तव्य केलं होतं. वारंवार आपण राजकीय नेते नाही आहोत, आपल्याला राजकारणात जायचं नाही. अशी वल्गना करणाऱ्या अभिजीत दीपकेंबाबत सोनम वांगचूक यांनी मोठा खुलासा केलाय.

“अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, मी त्यांचं खूप जवळून निरीक्षण केलं आहे,” असा खुलासा वांगचुक यांनी केला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान वांगचूक यांनी CJP चे संस्थापक अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांचे बारकाईने निरीक्षण केले होते. या तिघांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, असं वाटलं. जरी त्यांनी स्वतःहून हे कधीही स्पष्टपणे सांगितले नाही, आपल्याला त्यांची ती महत्त्वकांक्षा जाणवल्याचं वांगचूक म्हणाले. दरम्यान हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही सोनम वांगचूक यांनी ‘PGX Raw & Real’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलंय.

“राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात काही चुकीचं नाही”

अभिजीत दिपके, आशुतोष आणि सौरव यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांनी भूतकाळात आम आदमी पार्टीसाठी काम केलंय. अनेक लोक मला विचारतात की यांच्या काही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का? मला स्वतःला असं वाटतं की, होय, त्यांच्या नक्कीच राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. मी त्यांचं खूप निरीक्षण केलंय. पण यामध्ये काही चुकीचं किंवा वावगं आहे असं मला वाटत नसल्याचं वांगटूक म्हणाले.

“राजकीय महत्त्वाकांक्षा असणं ही एक स्वाभाविक गोष्ट''

सोनम वांगचुक यांनी सांगितले की, जवळपास दोन महिने चाललेल्या या विद्यार्थी आंदोलनादरम्यान, त्यांनी 'सीजेपी' (CJP) च्या संस्थापकांना वारंवार सल्ला दिला की, या आंदोलनाचा वापर कोणत्याही राजकीय पक्षासाठी व्यासपीठ म्हणून होऊ देऊ नये. दरम्यान राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणं हे तरुण नेत्यांमध्ये सामान्य आणि एक सकारात्मक बाब असते. पण तरीही त्यांनी या आंदोलनाची निष्पक्ष ठेवावं. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा 'दबाव गट' (pressure group) म्हणून त्याचे कार्य सुरू ठेवावे असे आवाहन वांगचूक यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glasses Cleaning Tips: चष्म्याचे ग्लास वारंवार खराब आणि धुरकट दिसतात? 'या' सोप्या ट्रिक्सने लेन्स दिसतील नव्यासारखे!

मोठी दुर्घटना! 270 नागरिकांना घेऊन जाणारी नाव उलटली

Monday Horoscope : कोणाचं नशीब चमकणार? प्रेम, करिअर अन् आरोग्याबाबत या ५ राशींना लाभ; सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला यशवंत सेनेचा पाठिंबा

Mangalsutra Unique Designs: साडी असो वा वेस्टर्न लूक; पातळ चेनचे ७ मंगलसूत्र डिझाइन्स दिसतील नेहमीच स्टायलिश

SCROLL FOR NEXT