Sonam Wangchuk ends hunger strike after Centre agrees to key demands over NEET paper leak protest. saam tv
देश विदेश

...तरच मी उपोषण सोडणार; सोनम वांगचुक यांनी सरकारकडे केल्या या २ प्रमुख मागण्या

Sonam Wangchuk Hunger Strike Ends After NEET Protest: नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेलं उपोषण सोनम वांगचुक यांनी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण सरकारकडे त्यांनी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.

Omkar Sonawane

सोनम वांगचुक अखेर यांनी अखेर उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. नीट पेपरफुटीवरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे. अलीकडेच त्यांना पोलिसांनी जंतर मंतरवरून जबरदस्तीने उचलून नेत रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांनी ठिकाणी देखील उपोषण सुरू ठेवले होते. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी वांगचुक यांना केली आहे.

कोणत्या मागण्यांवर ठोस आश्वासन द्यावं?

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई दिली जावी.

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात संसदेत अर्थपूर्ण चर्चा व्हावी.

वांगचुक यांनी पत्रात म्हटलं की, विविध राजकीय पक्षाच्या जवळपास ६५ खासदारांनी त्यांना पत्र लिहिलं आहे. त्यातील काही जणांनी भेट घेतली आहे. तर काही जण संध्याकाळपर्यंत भेट घेणार आहेत. सर्वांनी उपोषण सोडण्याची आग्रहाची विनंती केली आहे. देशाच्या सेवेसाठी अजून खूप काम करायचं आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मला अजून जगायचं आहे. माझ्या आयुष्याला दिशा देणारे शिक्षण आणि त्या क्षेत्रात मला परतायचं आहे. पण ज्यांच्यासाठी हे आंदोलन सुरू झालं आहे, त्या युवकांची किंमत मोजून मी हे करू शकत नाही.

या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कोणत्याही आंदोलकाविरोधात दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करू नये असे सरकारने स्पष्ट आश्वासन द्यावे, असे आवाहन मी करत आहे. निष्पक्ष आणि जबाबदारी निश्चित करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवणे हाच त्याचा एकमेव गुन्हा आहे, असेही वांगचुक यांनी पत्रात म्हटलं आहे.

वांगचुक म्हणाले की, जर असं आश्वासन मिळालं नाही तर मला उपोषण बेमुदत सुरू ठेवावं लागेल. आंदोलन दडपून टाकण्यासाठी पोलिसांकडून अधिक बळाचा वापर पुन्हा होणार नाही अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT