SONAM WANGCHUK ENDS 26-DAY HUNGER STRIKE AFTER PM MODI ASSURANCE; CJP CONTINUES TO DEMAND DHARMENDRA PRADHAN'S RESIGNATION Saam Tv
देश विदेश

Sonam Wangchuk : वांगचुकांनी उपोषण सोडलं, राजीनाम्याचं काय? उपोषण सोडण्यामागची इनसाईड स्टोरी काय?

Sonam Wangchuk Hunger Strike Update News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण मागे घेतले. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम असून केंद्र सरकारसोबत चर्चेची तिसरी फेरी होण्याची शक्यता आहे.

Bharat Mohalkar

  • सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींच्या आश्वासनानंतर 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले

  • जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या मध्यस्थीने चर्चेला सकारात्मक वळण

  • धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी अजूनही ठाम

  • केंद्र सरकार आणि सीजेपी यांच्यात तिसऱ्या फेरीची चर्चा होणार

भरत मोहोळकर, साम टीव्ही

गेल्या 26 दिवसांपासून नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतलयं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनानंतर आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या मध्यस्थीनंतर रुग्णालयात वांगचुक यांना ज्यूस पाजून उपोषण सोडलयं.मात्र वांगचुक यांनी उपोषण सोडण्याआधी 88 मिनटात काय घडलं?

दुसरीकडे केंद्रानं काँक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांशी दुसऱ्यांदा चर्चा केली. मात्र या दुसऱ्या फेरीतूनही काहीच निष्पन्न झालं नाही. कारण सीजेपीनं प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम भूमिका घेतलीय.त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा सीजेपीसोबत चर्चा करणार आहे.

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेऊन केंद्र सरकारला चर्चेची संधी दिली असली, तरी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा यामुळे दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण अजूनही तापलेले आहे.

वांगचुक यांनी केंद्र सरकारसोबत समोपचाराची भूमिका घेतली असली तरी सीजेपी मात्र अजूनही आक्रमक आहे, त्यामुळे चर्चेच्या तिसऱ्या फेरीनंतर तरी तोडगा निघणार का याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT