Sonam Raghuvanshi Raja Raghuvanshi Wedding Video Saam Tv News
देश विदेश

Raja Raghuvanshi: 'राजा जवळ आलेला मला आवडत नाही', हनिमूनदरम्यान सोनमचा बॉयफ्रेंड राजला मेसेज, चॅट्स समोर...

Sonam Shocking Chat Messages: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी राजाची पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह याच्यासह आणखी तीन साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणात आता राज आणि सोनमचे चॅट्स समोर आले आहेत.

Bhagyashree Kamble

राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात पोलिसांनी राजाची पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह याच्यासह आणखी तीन साथीदारांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, लग्नाआधीच नव्हे तर लग्नानंतरही सोनम आपल्या प्रियकराच्या सतत संपर्कात होती आणि तिने चॅटद्वारेच पतीच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोनम आणि राज कुशवाह यांच्यातील अनेक खळबळजनक चॅट्स समोर आले आहेत. त्यात सोनमने लिहिलं आहे की, "राजा जवळ आला की मला त्रास होतो, लग्न ठरल्यानंतर त्याच्यापासून दूर राहतेय." तिने चॅट्सद्वारे आपल्या बॉयफ्रेंडला याची माहिती दिली. दरम्यान, चॅटमधून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या ३ दिवसानंतर सोनमने तिच्या प्रियकरासोबत राजाच्या मृत्यूचा कट रचण्यास सुरूवात केली असल्याचं समोर आलं आहे.

लग्नानंतर सोनम आणि तिचा पती राज हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. हनिमुनला गेल्यानंतरही सोनम आपल्या प्रियकरासोबत चॅट करत होती. त्याला चॅटद्वारे सगळी माहिती देत होती. तिने रचलेल्या कटाप्रमाणे राजाचा काटा काढल्याचं पोलिसांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी पत्रकारांना या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

तीन आरोपी इंदूर येथील राज कुशवाहाचे मित्र आहेत. राज सोनम रघुवंशीच्या ऑफिसमध्ये काम करतो. दुसरा आरोपी आकाश राजपूत हा बेरोजगार आहे. तिसरा विशाल चौहान हा कॉलेजचा विद्यार्थी आहे. यापैकी कोणत्याही आरोपीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. सर्व आरोपींचे वय २० ते २५ असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडोटिया म्हणाले की, राजा रघुवंशी यांच्या अत्यसंस्काराच्यावेळी राज कुशवाह उपस्थित होते. असे अनेक व्हिडिओतून समोर आलं आहे. या घटनेनंतर सोनम आणि राजाच्या लग्नातील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, राज आणि सोनमच्या चॅट्समधूनही अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले; टी-२० सिरीजमध्ये टीम इंडिया २-१ ने आघाडीवर

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT