सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. अनेक मुले सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. काही देशांमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. आता ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनीही यासंबंधी मोठी घोषणा केली आहे. आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी करण्यात येत आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियाच्या वापराने १६ वर्षांखालील मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ नयेत यासाठी ब्रिटन सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई केली होती. त्यानंतर युरोपसह अनेक देशांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं. अलीकडेच कॅनडा या देशाने देखील यासंदर्भात घोषणा केली होती. सोशल मीडियाच्या वापरासंबंधी नियमांत बदल करण्यात येत आहे, तसेच मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याचा विचार केला जात आहे, असे म्हटले होते.
दरम्यान, हा निर्णय घेणे सोपे नव्हते. अनेक मोठ्या कंपन्या सरकारला आपला निर्णय मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. मात्र हा निर्णय घेण्यात येईल, असे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ठामपणे सांगितले. स्टारमर यांनी या निर्णयाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली. अनेक पालकांनी आम्हाला सांगितले की, त्यांची मुले स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत, असे ते म्हणाले.
आम्ही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालत आहोत. आजच्या युगात मुलं या दरीत ढकलली जात आहेत. तंत्रज्ञानाने मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात डोकावणे सुरू केले आहे. आता आम्ही हे यापुढे सुरू राहू देणार नाही. त्यामुळे मुलांना त्यांचे बालपण आम्ही त्यांना परत करू इच्छित आहोत, असे भावनिक विधानही त्यांनी केले. दरम्यान, सरकारने अलीकडच्या काळापासून अनेक तंत्रज्ञान कंपन्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. वयाची पडताळणी आणि अल्गोरिदम बदलण्यास सांगितले आहे. मुलांना अश्लील कंटेंटपासून दूर ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर करण्यात येणाऱ्या लाइव्ह स्ट्रिमिंगपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी बंदी घालण्यात यावी, असेही सरकारचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.