Snake Entered Man Private Part Saam Tv
देश विदेश

Shoking News: शौचासाठी गावाबाहेर गेलेल्या तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, डॉक्टरांनीही मारला डोक्यावर हात

UP Latest News: हरदोई जिल्ह्यातल्या बनियानी पूर्वा गावामध्ये राहणारा २५ वर्षीय तरुण सोमवारी संध्याकाळी शौचासाठी गावाबाहेर गेला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हरदोई जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शेतामध्ये शौचासाठी गेलेल्या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part) साप घुसून तो पोटात गेल्याची ही घटना आहे. रक्तबंबाळ अवस्थेत घाबरलेला तरुण घरी पळत पळत आला. त्याची अवस्था पाहून त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी या तरुणाची तपासणी केली तेव्हा ते देखील हैराण झाले.

हरदोई जिल्ह्यातल्या बनियानी पूर्वा गावामध्ये राहणारा २५ वर्षीय तरुण सोमवारी संध्याकाळी शौचासाठी गावाबाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्या प्रायव्हेट पार्टला काही तरी लागले आणि रक्त येऊ लागले. तो रडत रडत घरी आला आणि त्याने त्याच्या पोटात काळ्या रंगाचा किडा घुसल्याचे सांगितले. घाबरलेल्या या तरुणाने प्रायव्हेट पार्टमध्ये साप घुसल्याची भीती व्यक्त केली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी हरदोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले.

रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्याची तात्काळ तपासणी केली. तर तरुणाची अवस्था पाहून त्यांना सुद्धा धक्का बसला. डॉ. शेरसिंग यांनी सांगितले की, 'हा तरुण झाडा झुडपात शौच करत होता. त्यावेळी एखादे लाकूड त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसले. लाकूड लागल्यामुळे रक्त येऊ लागले. तरुण दारूच्या नशेत होता त्यामुळे त्याला वाटले की प्रायव्हेट पार्टला साप चावला आणि त्याच्या पोटात घुसला. पण आम्ही त्याची तपासणी केली तर तसे काहीही झाले नसल्याचे समोर आले.'

दरम्यान, हा तरुण दारुच्या नशेमध्ये असल्यामुळे तो कोणाचे काहीही ऐकण्यास तयार नव्हतो. तो पोटात साप घुसला असल्याचीच बडबड करत होता. जेव्हा ही बातमी संपूर्ण गावात पसरली तेव्हा सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला. सध्या या तरुणाची प्रकृती चांगली असून उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला घरी देखील सोडले.

Edited by- Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

SCROLL FOR NEXT