Snake Cat Photo
Snake Cat Photo Saam TV
देश विदेश

Snake Cat Photo: ही मांजर आहे की साप? Snake Cat च्या व्हायरल फोटोमागे दडलंय अनोखं रहस्य

Ruchika Jadhav

Snake Cat : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे अनेक फोटो व्हायरल होताना पहायला मिळतात. पाळीव प्राण्यांमध्ये शहरात आणि खेडेगावात देखील मांजर अनेक व्यक्ती पाळतात. शहरांमध्ये मांजरीच्या वेगवेगळ्या जाती पहायला मिळतात. या वेगवेगळ्या मांजरींचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या मांजरीचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. (Amazon Rainforest)

ही मांजर पाहून सुरूवातील व्यक्ती थोडे घाबरत आहेत. कारण ही मांजर साध्या मांजरींपेक्षा फार वेगळी आहे. तिच्यावर सापासारखे काळे आणि पिवळे पट्टे आहेत. मांजरीचा हा फोटो आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा फोटोपाहून अनेकांनी याला Snake Cat असं म्हटलं आहे. पुथ्वीवर असलेल्या मांजरींची ही फार दुर्मीळ प्रजाती असल्याचे काहींनी म्हटले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

सध्या या मांजरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मांजरीचा हा फोटो @Kamara2R या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की , “सर्पेन्स कॅटस ही पृथ्वीवरील मांजरीची एक दुर्मिळ प्रजाती आहे. अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये या मांजरी आढळतात. सध्या त्यांच्यावरील संशोधन कमी झाले आहे. सापासारख्या दिसणाऱ्या या प्रजातीच्या मांजरीचा फोटो पहिल्यांदा साल २०२० मध्ये समोर आला होता. त्यावेळी या मांजरीचे वजन २५ किलो इतके होते.

न्यूयॉर्क वेबसाईटने या विषयी एक पोस्ट शेअर करत खरी माहिती समोर आणली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अशी मांजर आजवर कोणीही पाहिलेली नाही. मात्र ती अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. मांजरीवर असलेल्या पटट्यांमुळे असा दावा केला जात आहे. मात्र ठोस पुरावे मिळेपर्यंत हा फोटो खरा की खोटा हे ठरवणे कठीण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis On Opposition | देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

Shantigiri Maharaj | नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरल्यानं दिवसभर चर्चा, शांतीगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?, Exclusive Video

Tamannaah Bhatia : फॅन्सी साडीत तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा, फोटो तुफान व्हायरल

Today's Marathi News Live : पीएम मोदींची पुण्यात सभा, चारही उमेदवार राहणार उपस्थित

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

SCROLL FOR NEXT