उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात राज्यसभेच्या 10 जागांच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करताना पुन्हा आश्चर्याचा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. यावेळी पक्षाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. उत्तर प्रदेश कोट्यातून राज्यसभेवर असलेल्या दोन केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार का, याबाबतही सध्या चर्चा सुरू आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या स्मृती इराणी आणि हरीश द्विवेदी यांना यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर बी.एल. वर्मा यांचा पत्ता कट झाल्यास राज्यसभा उमेदवारांच्या यादीत राजवीर सिंह राजू यांचे नाव येऊ शकते.
उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या या 10 जागांपैकी आठ जागा भाजपकडे, तर प्रत्येकी एक जागा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडे आहे. यावेळी या जागांची विभागणी भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये होण्याची शक्यता आहे. बसपचे एकमेव राज्यसभा खासदार रामजी गौतम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उच्च सभागृहात बसपचे प्रतिनिधित्व शून्य होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून गीता शाक्य आणि सीमा द्विवेदी यांच्या जागीही नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे. गीता शाक्य यांच्या जागेसाठी त्यांच्या समाजातील ममतेश शाक्य यांच्यासह अनेक नावांची चर्चा आहे. ओबीसी कोट्यातून भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पाल हेही संभाव्य दावेदार मानले जात आहेत. तर दलित चेहऱ्यांमध्ये विद्यासागर यांच्या नावाची चर्चा आहे. उमेदवार निवडताना सामाजिक समीकरणांवर भाजपचा भर असण्याची शक्यता आहे.
डॉ. दिनेश शर्मा यांची अंदमान-निकोबारच्या उपराज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी 11 सप्टेंबर रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी ब्राह्मण समाजातून हरीश द्विवेदी यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. अलीकडच्या काळात केंद्रीय नेतृत्वाचा हरीश द्विवेदी यांच्यावरील विश्वास वाढल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशातून भाजपच्या राज्यसभा उमेदवारांमध्ये स्मृती इराणी हे मोठे नाव असू शकते. पक्ष स्मृती इराणी यांचा उत्तर प्रदेशासह केंद्रीय पातळीवरही वापर करू शकतो. तसेच त्यांच्या माध्यमातून महिला प्रतिनिधित्वाचे समीकरणही साधले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.