sleeper vande bharat update  Saam tv
देश विदेश

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; स्लीपर वंदे भारत ट्रेनची महत्वाची अपडेट समोर

sleeper vande bharat update : रेल्वेने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिलीये. स्लीपर वंदे भारत ट्रेनची महत्वाची अपडेट समोर आलीये.

Vishal Gangurde

स्लीपर वंदे भारत ट्रेन डिसेंबरमध्ये पूर्णपणे तयार होणार

दिल्ली–मुंबई किंवा दिल्ली–कोलकाता या मार्गांवर धावण्याची शक्यता

स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी दोन ट्रेन सेट आवश्यक

भारतातील अनेक कुटुंब आणि मित्र मंडळी डिसेंबर महिन्यात फिरण्याचा प्लान करत असतात. तर काही जण वर्षाच्या पहिला महिना जानेवारीत फिरण्यासाठी निघतात. या पर्यटकांचा वाहतुकीसाठी पहिला पर्याय रेल्वेच असतो. याच प्रवाशांना रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन याच महिन्यात ट्रॅकवर उतरणार असल्याची माहिती हाती आली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत डिसेंबर महिन्यात पूर्णपणे तयार होईल. या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये सर्वच सुविधा उपलब्ध असल्याचं पाहायला मिळेल. लांब पल्ल्याच्या ट्रॅकवर ही ट्रेन धावणार असल्याने दोन ट्रेन सेट आवश्यक असणार आहे. या ट्रेनचा एक सेट आधीच पूर्ण झाला आहे. दुसऱ्या सेटचं काम राहिलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ट्रेनचा दुसरा सेट तयार झाल्यावर रेल्वे प्रवाशांची प्रतीक्षा संपेल.

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, स्लीपर वंदे भारत लांब पल्ल्याची असणार आहे. ही स्लीपर वंदे भारत ट्रेन दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता मार्गावर ट्रेन चालवण्यात येईल.रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी दिलीप कुमार यांनी सांगितलं की, रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार वेगाने काम सुरु झालं आहे.

भारतातील दोन मार्गावर ट्रेनची सर्वाधिक ये-जा असते. एक दिल्ली ते मुंबई आणि दुसरा दिल्ली ते कोलकाता या मार्गावर ट्रेनची सर्वाधिक येजा असते. याच मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी सुरु झाली आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दोन ट्रेन सेटची आवश्यकता भासणार आहे. या ट्रेनचा एक सेट मागील वर्षी तयार झाला होता. मात्र, त्यामध्ये सुधारणा करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यात आणखी सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर आता या ट्रेनची ट्रायल घेण्यात येणार आहे. तर स्लीपर वंदे भारतचा दुसरा सेट देखील तयार आहे. प्रवासी याच ट्रेनची वाट पाहत आहेत. लवकरच या ट्रेनमधून प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Star Prem Bhatia Accident: सुप्रसिद्ध रीलस्टारच्या दुचाकीचा अपघात, प्रेम भाटीचा उपचारादरम्यान मृत्यू

Matheran Trip Budget : मुंबई-पुण्याजवळचा स्वर्ग! माथेरान ट्रिपचा खर्च किती येतो? जाणून घ्या

RBI ची मोठी कारवाई! राज्यातल्या 'या' सहकारी बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी

Maharashtra News Live Update : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचाल करणे दुचाकी स्वराला उडवलं, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Raigad : रायगड हादरले! आईने ४ मुलांना विष पाजून स्वतःही संपवलं आयुष्य; नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT