Shraddha Walker Case Update Saam TV
देश विदेश

Shraddha Walker Case : 20 हजार लिटर पाणी फ्री, तरीही आफताबला ३०० रुपये बिल; पोलिसांना वेगळाच संशय

Shraddha Walker Case: घरात रक्ताचा एकही डाग नसल्यामुळे दिल्ली पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोठ्या कष्टाने किचनमध्ये एका ठिकाणी रक्ताचे डाग सापडले.

वृत्तसंस्था

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Delhi Crime News: श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज-रोज धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आफताब आणि श्रद्धा ज्या घरात भाड्याने राहत होत, त्या फ्लॅटमध्ये पाण्याचे बिल जास्त आले होते. दिल्लीत २० हजार लिटरपर्यंत पाणी दिल्ली सरकारकडून मोफत आहे. तरिही आफताबला ३०० रुपये पाण्याचे बिल आले. यावरुन आफताबने पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला होता असं स्पष्ट होतं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने पाण्याचा वापर का केला? त्याचा श्रद्धाच्या हत्येशी काही संबंध तर नाही ना? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. (Shraddha Walker Case Update)

दिल्लीतील (Delhi) छतरपूर पहाडी भागात आफताबच्या फ्लॅटच्या वर राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाच्या मजल्यावरील पाण्याचे बिल शून्य आहे, परंतु आफताबच्या फ्लॅटचे 300 रुपये पाणी बील थकित असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत २० हजार लिटरपर्यंत पाणी दिल्ली सरकारकडून मोफत आहे. त्याला कोणतंही बील येत नाही. आफताबच्या फ्लॅटजवळ राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार साधारण सर्वांचे पाण्याचे बिल शून्य येते, मात्र आफताबच्या फ्लॅटचे पाण्याचे बील ३०० रुपये थकीत असल्याचे घरमालकाकडून समोर आलं आहे. त्यामुळं आफताब हे पाणी रक्ताचे डाग धुण्यासाठी वापरता होता का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आफताबच्या प्लानने पोलिस आणि फॉरेन्सिक टीमलाही आश्चर्य

श्रद्धा वालकर खून प्रकरण दिल्ली पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. आफताबने प्लान (Crime) करून केलेल्या हत्येनं दिल्ली पोलिसही हैराण झाले आहेत. आफताबने घरातील बेडवर श्रद्धाचा गळा आवळून तिचा जीव घेतला. यानंतर त्यांच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले, मात्र घरात रक्ताचा एकही डाग नसल्यामुळे दिल्ली पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोठ्या कष्टाने किचनमध्ये एका ठिकाणी रक्ताचे डाग सापडले.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या मते, रक्ताचे डाग शोधण्यासाठी पोलिस गुन्हा घडला त्या ठिकाणी बेंझिन नावाचे रसायन टाकतात. यामुळे जिथे-जिथे रक्त सांडते तिथे ती जागा लाल होते. पण माहित नाही आफताबने कोणत्या केमिकलने घर स्वच्छ केले आहे? खुनाच्या ठिकाणी बेंझिन हे रसायन टाकूनही रक्ताचे डाग सापडत नाहीत. मोठ्या कष्टाने गॅस सिलिंडर ठेवलेल्या स्टॅन्डवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. (Latest Marathi News)

आफताबने प्लान करून हत्या केलेल्या बेडवर कोणताही पुरावा मिळाला नाही. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे १८ पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याला शिक्षा होण्यासाठी मृतदेहाच्या तुकड्यांसह ती सर्व पॉलिथीन आवश्यक आहे. परंतु मृतदेहाचे सर्व तुकडे मिळाले नाहीत किंवा फ्रीजमध्येच रक्ताचे डाग आढळले नाहीत. बेन्झिन चाचणी करूनही फ्रीजमध्ये रक्ताचे डाग आढळले नाहीत. त्याने किती हुशारीने ही हत्या घडवून आणली याचे पोलिस आणि फॉरेन्सिक टीमलाही आश्चर्य वाटत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT