Shraddha Walkar Case Latest Updates: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने मंगळवारी (९ मे) श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला यांच्यावर आरोप निश्चित केले आहे. यामुळे आफताबचे पाय खोलात गेले असून आता त्याला हत्येच्या आरोपाखालील केसला सामोरे जावं लागणार आहे. (Latest Marathi News)
साकेत कोर्टाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी IPC कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत खून आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल आरोप निश्चित केले. साकेत कोर्टाने सांगितले की, सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पुरेसे पुरावे सादर केले. हे पुरावे सबळ असल्याने आरोपी आफताबविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याचवेळी आरोपी आफताबने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप (Crime News) फेटाळून लावत आपण खटल्याला सामोरे जाणार असल्याचे सांगितले. कोर्टाने आफताबवरील सर्व आरोप त्याला वाचून दाखवले. न्यायालयाने म्हटले की, 'श्रद्धा वालकरची १८ मे २०२२ रोजी सकाळी ६:३० नंतर अज्ञात वेळी हत्या करण्यात आली, हा गुन्हा कलम ३०२ अंतर्गत दंडनीय आहे.
'१८ मे ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने, गुन्हा झाला आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून तिच्या मृतदेहाची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली. तसेच पुरावा नष्ट करण्याचा देखील गुन्हा केला'.
न्यायालयाने (Court) आफताबला सांगितले की, “ तुझ्यावर श्रद्धाची हत्या केल्याचा आणि तिच्या शरीराच्या अवयवांची छतरपूर आणि इतर ठिकाणी विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे.” त्यानंतर न्यायालयाने आरोपीला विचारले की, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे की नाही?
याला उत्तर देताना आफताबने आपल्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले की, आम्ही आरोप मान्य करत नाही आणि खटल्याला सामोरे जाऊ. आता १ जून रोजी श्रद्धा वालकरचा खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांवर सुनावणी होणार आहे.
आरोपी आफताब पूनावाला याने गेल्यावर्षी त्याची प्रेयसी श्रद्धा वालकर हिची दिल्लीतील भाड्याच्या घरात हत्या केली होती. हत्येनंतर त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर आरोपीने ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईची रहिवासी होती. दोघेही मुंबईत 'बंबल' या डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटले होते. त्यानंतर ते मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करू लागले आणि तिथूनच दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. नंतर ते दिल्लीला आले. आफताबने दिल्लीत आल्यानंतर श्रद्धाची हत्या केली होती.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.