Karnataka zipline accident Video : कर्नाटकातील दांडेली येथे एका रिसॉर्टमध्ये थरारक आणि तितकीच धक्कादायक दुर्घटना घडली. पावसाळ्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकासोबत जिपलाइन राइडदरम्यान अपघात झाला. विजयपूर येथील हा तरुण तब्बल ४० फूट उंचीवर असताना अचानक जिपलाइनचा लॉक तुटला, अन् तो थेट खाली तोंडावर कोसळला. या संपूर्ण घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या भयानक घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात त्याचा जीव वाचला असला, तर त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या संपूर्ण घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, रिसॉर्ट प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच सुरक्षा उपकरणांची योग्य तपासणी झाली नव्हती आणि हा अपघात घडला, असा गंभीर आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला आहे.
या दुर्घटनेत तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हातांना आणि पायांना अनेक फ्रॅक्चर्स झाले आहेत. तसेच त्याला अंतर्गत दुखापतीही झाल्याचे समोर आले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्या तरुणाची ओळख विजयपुरा येथील रहिवासी कुबेर सुरपूर अशी पटली आहे. कुबेरच्या कुटुंबीयांनी रिसॉर्टकडून जबाबदारीची मागणी केली असून, योग्य देखभाल आणि सुरक्षा तपासणीमुळे हा अपघात टाळता आला असता, असे म्हटले आहे.
कुबेरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो हवेत असताना झिपलाइनचा सेफ्टी लॉक उघडल्याने तो जमिनीवर पडला. कुटुंबीयांनी रिसॉर्ट व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. दुर्घटनेनंतर कुबेरला प्रथम दांडेली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी विजयपूर रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने चांगल्या उपचारांसाठी त्याला नंतर मिरज येथे हलवण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.