Shocking Video Saam Tv
देश विदेश

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

Tanvi Pol

सोशल मीडियावर आपल्याला आजवर घडलेल्या अतिशय थराराक अपघातांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. कधी यात वाहनांचा अपघात होतो तर कधी विमानांचा. पंरतू सोशल मीडियावर नुकताच एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दोन किंवा तीन नाही तर तब्बल अठ्याहत्तर नागरिकांसह बोट खोल समुद्रात पलटली आहे. संपूर्ण धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटना कशी घडली?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक अथांग असा समुद्र दिसून येत आहे. या समुद्रात दोन नवका दिसत आहे. एका नवकामधून एक व्यक्ती संपूर्ण घटना कैद करत आहे तर दुसरीकडे एक मध्यम आकाराची बोट दिसून येत आहे. व्हिडिओ तुम्ही पुढे पाहिले तर जी समुद्रात अनेक व्यक्तींनी भरलेली बोट दिसतेय ती पाण्यातून येत आहे. मात्र पाहता पाहता बोट संपूर्ण पाण्यात पडून त्यामधील संपूर्ण नागरिक पाण्यात सामावले जातात. मात्र समोरच्या बोटवरील व्यक्तींनी घटना कॅमेऱ्यात(camera) कैद केलेली आहे. काही समजण्याच्या आधीच संपूर्ण व्यक्तींनी भरलेली बोट पाण्यात पडते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@priyarajputlive'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनध्ये ''आफ्रिकन काँगोमध्ये बोट उलटून ७८ जणांचा मृत्यू झाला'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमधून व्हिडिओ काँगोमधील असल्याचे समजत आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे नेमके समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ साधारण ५ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Navaratri 2024 : मुंबईत 'या' देवीच्या मंदिरातील भिंत आहे खूप खास, सर्व इच्छा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT