Viral Video News : एका मेडिकल कॉलेजमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेदरम्यान स्वयंपाकासाठी शौचालयाच्या नळातील पाणी वापरल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्याने संतापाची लाट उसळल्याचे म्हटले जात आहे.
६ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला देशभरातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थिती लावली होती. उपस्थित मान्यवरांसाठी कॉलेजने भोजनाची व्यवस्था केली होती. पण हे जेवण बनवण्यासाठी शौचालयातील पाणी वापरले गेल्याचे एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला शौचालयाच्या नळाला पाईप जोडल्याचे दिसते. तो पाईप पुढे स्वयंपाक सुरु असलेल्या जागेपर्यंत जात असल्याचे दिसते. व्हिडीओवरुन शौचालयाच्या नळाचे पाणी जेवण तयार करण्यासाठी वापरले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या व्हिडीओवर मेडिकल कॉलेज प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजचे डीन नवनीत सक्सेना म्हणाले, 'पाण्याचा वापर फक्त घाणेरडी भांडी स्वच्छ करण्यासाठी केला जात होता. स्वयंपाकासाठी पाणी वापरले गेले नाही. व्हिडीओने चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.' त्याशिवाय मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. संजय मिश्रा यांनी 'वैद्यकीय परिषद शैक्षणिक ब्लॉकमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर मागच्या मोकळ्या जागेत अन्न शिजवले जात होते, अशी माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.