Gujarat Fire Saam Tv
देश विदेश

Shocking: घरात साखरपुड्याची लगबग असतानाच भयंकर घडलं, नवरदेवासह आई-वडील आणि भावाचा मृत्यू

Gujarat Fire: गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच अचानक भयंकर घटना घडली. घराला आग लागून त्यामध्ये होरपळून चौघांचाही मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • गोध्रामध्ये एसी स्फोटामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

  • मुलाच्या साखरपुड्यासाठी सर्वजण घरातून निघणार होते तेवढ्यात भयंकर घटना घडली

  • शॉर्टसर्किटमुळे घरात आग पसरून चारही जण होरपळले

गुजरातच्या गोध्रामधून मन सुन्न करून टाकणारी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या साखरपुड्यासाठी हे सर्वजण घराबाहेर जाणार होते पण त्यापूर्वी भयंकर घडलं. घरामध्ये एसीचा स्फोट झाला आणि आग लागली. या आगीमध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झाला. एकाच घरातून एकाच दिवशी चौघांच्या अंत्ययात्रा निघाल्या. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोध्रा शहरातील बमरोली रोडवरील एका बंगल्यामध्ये घडली. याठिकाणी वर्धमान ज्वेलर्सचे मालक कमलभाई दोशी (५० वर्षे), त्यांची पत्नी देवलबेन दोशी (४५ वर्षे) आणि दोन मुलं देव दोशी (२४ वर्षे) आणि राज दोशी (२२ वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. घरामध्ये लागलेल्या आगीमध्ये होरपळून या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कमलभाई दोशी यांचा मोठा मुलगा देवचा साखरपुडा ठरला होता. आज सकाळी दोशी कुटुंबातील सर्वजण तयारी करून साखरपुड्यासाठी नवरीच्या घरी वापीला जाणार होते. पण सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरातील सोफ्याला अचानक आग लागली आणि संपूर्ण घरात आग पसरत गेली. या आगीमध्ये होरपळून चौघांचा देखील मृत्यू झाला. ही आग एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोशी यांच्या घरातून धूर येत असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता. आग संपूर्ण घरात पसरली होती. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. तर घराच्या वरच्या मजल्यावर चौघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी या चौघाचे मृतदेह ताब्यात घत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

एक व्हिडीओ, उमेदवारी गेली, भाजपकडून ट्रोल, माघारीनंतर रडारड

SCROLL FOR NEXT