Rajasthan Shocking News  Saamtv
देश विदेश

Shocking News: हृदयद्रावक! मांजरीला घाबरून पळाली अन् उकळत्या दुधात पडली, चिमुकलीचा करुण अंत

Rajasthan News: राजस्थानमध्ये हृदयद्रावक घटना घडली. मांजरीला पाहून घाबरून पळत असताना ३ वर्षांची चिमुकली उकळत्या दुधात पडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Priya More

उकळत्या दुधामध्ये पडून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली. राजस्थानच्या डीग येथे मांजरीला घाबरून चिमुकली पळाली आणि उकळत्या दुधाच्या पातेल्यामध्ये पडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, डीग येथील कामा कस्बेच्या अगमा भागामध्ये ही घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या जितेंद्र सिंह यांची ३ वर्षांची मुलगी सारिका टेरेसवर खेळत होती. जवळच चुलीवर दूध गरम करण्यासाठी ठेवले होते. घरातील सर्वजण आपआपल्या कामामध्ये व्यस्त होते. त्यावेळी अचानक टेरेसवर मांजर आली. मांजरीला पाहून सारिका घाबरली आणि ती पळू लागली अन् तिचा तोल जाऊन ती उकळत्या दुधाच्या पातेल्यात पडली.

सारिकाच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्व मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. उकळत्या दुधामुळे सारिका ५० टक्के भाजली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सारिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सारिकावर जयपूरमध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान तिने प्राण सोडले. सारिकाच्या अचानक सोडून जाण्याने तिच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला.

सारिकाच्या वडिलांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, घरामध्ये स्वयंपाक करत असताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. छोटीशी चूक आपल्या मुलांच्या जीवावर बेतू शकते जे आमच्यासोबत घडलं आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT