Snake Inside Women Ear  Saam TV
देश विदेश

Snake Video : बापरे! तरुणीच्या थेट कानातच शिरला साप; VIDEO पाहून थरकाप उडेल

साम टिव्ही ब्युरो

Snake Inside Women Ear : साप असा शब्दही जर कानावर पडला तर भल्याभल्यांना घाम फुटतो. पण कधी कानातच साप (Snake) गेला तर..? ऐकून धक्का बसेल, पण एका तरूणीच्या कानात चक्क साप गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे लोक आता आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सतर्क करण्यासाठी हा व्हिडीओ (Viral Video) शेअर करत आहेत. (Snakes Enter In Women Ear Watch Video)

तरुणीच्या कानात साप कसा शिरला?

प्राप्त माहितीनुसार, एक तरुणी आपल्या घरात निवांत झोपली होती. त्यावेळी तिला आपल्या कानात काहीतरी शिरलं असं कळालं. कानाला भयंकर त्रास होत असल्याने सदरील तरुणी डॉक्टरांकडे पळत गेली. जेव्हा डॉक्टरांनी तरुणीच्या कानाची तपासणी केली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या तरुणीच्या कानात साप गेला असल्याचं डॉक्टरांना कळालं. सुरूवातील डॉक्टरही घाबरले होते. मात्र त्यांनी धिरानं काम घेतलं. डॉक्टरांनी तरुणीला बसवून हातात ग्लोज घातले आणि लहान चिमट्याने सापाला बाहेर काढलं. ही घटना नक्की कुठली आहे, हे कळू शकलेलं नाही. (Snakes And Women Viral Video)

दरम्यान, हा व्हिडीओ shilparoy9933 नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे डॉक्टर चिमट्याच्या मदतीने सापाला कानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

सापाचे डोके कानातून बाहेर स्पष्ट दिसत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, तरुणीच्या कानात साप कसा गेला याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आली नाही. काही सेकंदांचाच असलेला हा व्हिडीओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT