California school board meeting Saam Tv
देश विदेश

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

California school board meeting: शाळेच्या बोर्ड मिटिंगमध्ये भयंकर घटना घडली. एका महिलेने अधिकाऱ्यांना जाब विचारत कपडे काढले. याचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • कॅलिफोर्नियातील शाळेच्या बोर्ड मिटिंगमध्ये महिला अचानक कपडे काढू लागली.

  • ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या लॉकर रूम धोरणाचा निषेध करण्यासाठी महिलेने हे कृत्य केले.

  • या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • या घटनेमुळे गोंधळ उडाल्याने मिटिंग तहकूब करण्यात आली.

अमेरिकेतील एका शाळेत नुकत्याच पार पडलेल्या बोर्ड मीटिंगमध्ये एका महिलेने गोंधळ घातला. या महिलेने अचानक तिचे एक एक कपडे काढायला सुरुवात केली आणि फक्त बिकिनीवरच ती अधिकाऱ्यांना जाब विचारू लागली. ही घटना कॅलिफोर्नियामध्ये घडली. या मिटिंगमधील व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, बेथ बॉर्न असं या महिलेचे नाव आहे. या महिलेने याआधी देखील असेच गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या लॉकर रूम आणि वॉशरूमचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली या जिल्ह्याच्या धोरणाचा ही महिला निषेध करत होती. ही महिला मॉम्स फॉर लिबर्टी नावाच्या संस्थेची अध्यक्ष आहे. १८ सप्टेंबर रोजी या महिलेने डेव्हिस जॉइंट युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित करत असताना तिने हे धक्कादायक कृत्य केले. त्यामुळे मिटिंगमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले.

बोर्ड मिटिंगमध्ये कपडे काढणारी महिला या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे केली, 'मी डेव्हिस युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये एका पदावर आहे आणि आज मी तुमच्याशी ज्युनियर हायस्कूलमधील लॉकर रूमसाठीच्या धोरणांबद्दल बोलण्यासाठी इथे आली आहे. एमर्सन, होम्स, हार्पर ज्युनियर हाय. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण वर्गासाठी कपडे काढण्यासाठी सांगू. त्यामुळे मी तुम्हाला फक्त हे सांगते की जेव्हा कपडे काढले जातात तेव्हा कसे वाटते.'

या महिलेने पुढे सांगितले की, 'मी माझे कपडे काढून फक्त हे दाखवून इच्छित होती की सध्याच्या नियमांनुसार मुलींना किती असुरक्षित वाटू लागले आहे.' या महिलेने कपडे काढायला सुरुवात करताच बोर्ड मिटिंगमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वांनी या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने आपली पँट, शर्ट काढला आणि फक्त बिकिनीवरच भाषण देत राहिली. या गोंधळानंतर बोर्ड सदस्यांनी बैठक तहकूब केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RSS ला १०० वर्षे पूर्ण, PM मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि स्मारक नाणं जारी; काय आहे वैशिष्ट्ये?

Dussehra Marathi Wishes: दसरा आणि विजयादशमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा आणि मेसेजेस

Mumbai To Pawna Lake: वीकेंडसाठी प्लॅन करताय? मुंबईवरून पावना लेकला कसे पोहोचाल? वाचा सविस्तर माहिती आणि पर्याय

Nalasopara : नालासोपाऱ्यात शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग | VIDEO

Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT