Congress leader death saam tv
देश विदेश

Shocking: घराजवळच्या तलावात आढळला काँग्रेस नेत्याचा मृतदेह, राजकीय वर्तुळात खळबळ

Congress Leader Death: वायनाडमध्ये काँग्रेस नेत्याचा मृतदेह घराजवळच्या तलावात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. या नेत्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  1. वायनाडमध्ये काँग्रेस नेते जोस नेलेडम यांचा तलावात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

  2. फसवणुकीच्या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी आत्महत्या केली.

  3. त्यांनी तलावात उडी मारून आयुष्य संपवलं.

  4. प्रियंका गांधी वायनाड दौऱ्यावर असताना ही घटना घडली.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. वायनाडचे मुल्लानकोल्ली ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेसचे नेते जोस नेलेडम यांचा मृतदेह घराजवळील एका तलावामध्ये आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. काँग्रेस नेत्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

प्राथमिक पोलिस तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, काँग्रेस नेत्याने आत्महत्या केली. त्याने आधी हाताची नस कापली, त्यानंतर विष पिऊन तलावात उडी मारल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुल्पल्ली काँग्रेस वॉर्ड कमिटीचे अध्यक्ष कानट्टुमाला थानकाचन यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच काँग्रेस नेत्याने आत्महत्या केली.

काँग्रेस नेत्याने तलावात उडी मारल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वायनाडच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, नेलेडम यांची चौकशी नुकताच करण्यात आली होती. एका स्थानिक काँग्रेस नेत्याला फसवल्याच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हेगारी खटल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. ही चौकशी सुरू असतानाच त्यांनी आयुष्य संपवले. या घटनेमुळे वायनाडमध्ये राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police: मोठी बातमी ! वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही पोलीस भरतीत संधी, आदेश जारी

Govind Barge Case: 'मेरे पास तेरे जैसे चार', माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Pooja Gaikwad : माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणातील डान्सरचे रील्स व्हायरल, पूजा गायकवाडचे फॉलोवर्स पाचपट वाढले

Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरेसेना-मनसेचा संयुक्त मोर्चा; महायुतीविरोधात फुंकलं रणशिंग

Pet Dog: तुम्ही कुत्रा पाळलाय...सावधान! नियम पाळा अन्यथा कुत्रा जप्त

SCROLL FOR NEXT