pregnant women 22 January Birth of babies Saam TV
देश विदेश

Shocking News: महिलेनं केला 'गरोदर' घोटाळा, १७ वेळा प्रेग्नंट; कपड्यांच्या आत ठेवायची उशी, कारण चक्रावणारं!

Women Pregnant Scam: एका महिलेने तर चक्क प्रेग्नेंट असल्याचं भासवत सरकारलाच लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महिलेचा प्रेग्नेंट घोटाळा पाहून अनेकजण चक्रावले आहेत.

Satish Daud

Woman Fake Pregnancies 17 Times

झटपट पैसे कमविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काहीजण पैसा कमविण्यासाठी दिवस रात्र काबाडकष्ट करतात. तर काहीजण वेगवेगळ्या शक्कल लढवून अनेकांना गंडा घालतात. एका महिलेने तर चक्क प्रेग्नेंट असल्याचं भासवत सरकारलाच लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महिलेचा प्रेग्नेंट घोटाळा पाहून अनेकजण चक्रावले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा प्रकार इटलीमध्ये घडला आहे. बार्बरा आयल (वय ५५) असं प्रेग्नेंट घोटाळा करणाऱ्या महिलेचं नाव आहे. मातृत्व योजनेचा लाभ घेत तिने सरकारला ९८ लाख रुपयांचा चुना लावला आहे. दरम्यान, आरोप सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने बार्बराला दीड वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्बरा एका खासगी कंपनीत काम करते. घरबसल्या झटपट पैसे कमविण्यासाठी बार्बरा आणि तिच्या पतीने मोठा प्लान आखला. गर्भवती असल्याचं भासवून दोघांनीही सरकारी योजनेचा लाभ घेण्याचं ठरवलं.

त्यानुसार, बार्बराने २४ वर्षांत तब्बल १७ वेळा आपण गरोदर असल्याचे भासवलं. विशेष बाब म्हणजे, बेबी बंब दाखवण्यासाठी बार्बराने अनेकदा उशीचा वापर केला. सरकारी कार्यालयात तसेच ऑफिसात बार्बरा उशी लावून फिरत होती.

जवळपास २४ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. जीवाला धोका असल्याने १२ वेळा आपल्याला गर्भपात करावा लागला, असंही बार्बराने आपल्या सहकाऱ्यांना पटवून सांगितलं. अखेर अधिकाऱ्यांना बार्बरावर संशय आला. त्यांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता, सर्व बनाव उघडकीस आला.

झटपट पैसे कमविण्यासाठी आपण हा बनाव रचल्याची कबुली बार्बरा आणि तिच्या पतीने दिली. अखेर पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करत त्यांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने यावर सुनावणी घेत बार्बराला दीड वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT