आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी...तुम्ही मुलांना डब्यात पुऱ्या देता का...? पुऱ्या देत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण, पुऱ्या खाणं एका मुलाच्या जीवावर बेतलंय...नक्की काय घडलाय हा प्रकार पाहुयात.
पुरी खाणं 11 वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतलंय...शाळेत दुपारच्या सुट्टीत मुलगा जेवत होता...आईनं दिलेल्या पुऱ्या आवडीने खात होता...मात्र, एकामागोमाग एक अशा 3 पुऱ्या खाल्ल्याने मुलाला घास लागला.यावेळी मुलाला श्वास घ्यायला त्रास झाला. त्यामुळे जीव गुदमरून मुलाचा शाळेतच मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना घडलीय तेलंगणाच्या हैदराबादमध्ये.सहावीत शिकणाऱ्या मुलाला त्रास होऊ लागल्याने शिक्षकांनी पालकांना फोन करून माहिती दिली. मात्र, तोपर्यंत या मुलाने प्राण सोडला होता.त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.मात्र, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.हा सगळा प्रकार कसा घडलाय पाहुयात...
मुलगा हा शाळेत दुपारी जेवण करत होता. डब्यात त्याने पुरी भाजी आणली होती. 3 पुऱ्या एकामागोमाग एक खाल्ल्या.पुऱ्या खाताना पाणी न प्यायल्याने घास लागला. घास लागल्याने मुलाची जीव गुदमरला. मुलाने पुऱ्या खाताना पाणी न प्यायल्याने त्याचा जीव गुदमरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना डब्यात पुऱ्या देताना सावधगिरी बाळगा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.