Gujarat Lift Accident Saam Tv
देश विदेश

Lift Accident: लिफ्टमधून बाहेर पडताना काकांसोबत जे घडलं ते पाहून शॉक बसेल, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Gujarat Lift Accident Video: गुजरातमध्ये लिफ्ट अपघाताची भयंकर घटना समोर आली आहे. लिफ्टचे दार उघडताच काका बाहेर पाय ठेवतात आणि लिफ्ट सुरू होते. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • गुजरातमधील वलसाड येथे लिफ्ट अपघाताची धक्कादायक घटना घडली

  • लिफ्टचे दार उघडताच काका खाली कोसळली

  • थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली

उंच इमारतींच्या लिफ्टमध्ये अपघाताच्या अनेक घटना घडत असल्याचे समोर येत असते. कधी लिफ्टमध्ये कुणी अडकल्याचे, कधी लिफ्ट कोसळल्याचे तर कधी लिफ्टच्या दारामध्ये अडकून काहींचा मृत्यू झाल्याच्या अंगावर काटा आणणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना गुजरातमध्ये घडली. लिफ्टचे दार उघडताच काका खाली पडले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं पण काकांनी प्रसांगवधान दाखवल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या वलसाड येथील सरदार हाइट्स येथील साबरमती इमारतीमध्ये ही घटना घडली. या इमारतीच्या लिफ्टमध्ये सोमवारी सकाळी एक भयानक अपघात झाला. लिफ्टचे दार उघडताच काकांनी बाहेर पाय ठेवला. तेवढ्यात लिफ्ट सुरू झाली आणि वर गेली आणि काका खाली पडले. या अपघातामध्ये काका गंभीर जखमी झाले. वत्सलभाई पांचाळ असं जखमी झालेल्या काकांचे नाव आहे. या अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली पण ते चमत्कारिकरित्या बचावले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेत आहे की वत्सलभाई पांचाळ लिफ्टमध्ये येतात. त्यांना ज्या मजल्यावर जायचे असते त्या मजल्याचे बटण ते दाबतात. लिफ्टमध्ये उभं राहून ते तो मजला येण्याची वाट पाहतात. त्या मजल्यावर लिफ्ट पोहचल्यानंतर दार उघडते. लिफ्टचे दार उघडल्यामुळे वत्सलभाई बाहेर जाण्यासाठी पाय पुढे ठेवतात. तेवढ्यात लिफ्ट वरच्या दिशेने सरकू लागते आणि वत्सलभाई खाली जोरात पडतात. त्यांचे डोके वरच्या बाजूला आदळते.

वत्सलभाई वेळेत लिफ्टमधून बाहेर पडले म्हणून त्यांचा जीव वाचला. लिफ्ट अचानक सुरू झाल्यामुळे ते खाली पडतात. क्षणात होत्याचे नव्हते होते. वत्सलभाई जर वेळेत बाहेर पडले नसते तर ते लिफ्ट आणि भिंतीच्या मध्ये अडकले असते आणि चिरडले गेले असते. पण त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या भयंकर घटनेत सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.

या घटनेनंतर सरदार हाइट्स सोसायटीमधील रहिवासींमध्ये भीतीचे वातावरण आहे. नियमित तपासणीचा अभाव आणि लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे ही घटना घडल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. सोसायटीच्या अध्यक्षांनी सांगितले की, दुरुस्तीसाठी लिफ्ट कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे. परंतू घटनेपूर्वी कोणत्याही मोठ्या तक्रारी आल्या नव्हत्या. या घटनेमुळे गुजरातमध्ये लिफ्ट सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

Arjun Tendulkar Wedding: 'मास्टर ब्लास्टर' होणार वरबाप; अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची हजेरी, पाहा फोटो

Dhurandhar Actress : 'धुरंधर' गर्लवर बलात्काराचा प्रयत्न, स्पॉट बॉयचं काळं कृत्य सांगताना अभिनेत्रीचा संताप अनावर

Arjun Tendulkar Wedding : करोडपती आहेत अर्जुन तेंडुलकरच्या सासर कडचे, नेमका व्यवसाय काय करतात?

चंद्रग्रहणाचं सूतक ठरलं काळ! स्नानासाठी गेलेल्या ६ चिमुरड्यांचा वेदनादायी अंत; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT