Crime Saam tv
देश विदेश

Varanasi Crime News : धक्कादायक! नोकरी दिली नाही म्हणून संतापला, मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

Varanasi News : वाराणसीतील कुरियर मॅनेजरवर नोकरी नाकारल्यामुळे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी त्यांच्या चेहऱ्यावरून गेली असून, मॅनेजर गंभीर जखमी झाले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Alisha Khedekar

उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून संतापजनक प्रकार समोर आलं आहे. कुरियर डिलिव्हरीच्या मॅनेजरने एका व्यक्तीला नोकरी देण्यास मनाई केल्याने अज्ञात व्यक्तीने मॅनेजरवर गोळीबार करून घटनस्थळावरून पळ काढला आहे. या घटनेने वाराणसी हादरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.

उत्तर परदेशातील वाराणसीमधील चिताईपुर पोलीस ठाणे परिसरातील एका कुरियर डिलिव्हरी कंपनीचे मॅनेजर विकास तिवारी गोदामात कामानिमित्त उशिरापर्यंत थांबले होते. रात्री फार उशीर झाल्याने विकास यांनी गोदाम बंद करण्याचे ठरवले. इतक्यात एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे काम मागण्यासाठी तिथे पोहचली. रात्री फार उशीर झाल्याने विकास यांनी त्या व्यक्तीला उद्या ये असं सांगितलं. यानंतर आरोपी तिथून निघून गेला.

मात्र अवघ्या ३० मिनिटानंतर तो परत आला. त्यानंतर त्या दोघांमध्ये वादविवाद सुरु झाला. हा वाद टोकाला गेल्याने रागाच्या भरात आरोपीने मॅनेजरने गोळी झाडली. आणि आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. ही गोळी विकास यांच्या चेहऱ्यावरून गेली. या गोळीबारात मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत विकास यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान विकास यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. ज्यामध्ये आरोपी स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. आरोपीने मॅनेजरवर गोळी का झाडली हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत? महत्वाची अपडेट समोर

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; 'या' दिवसापासून रंगणार महोत्सव

Eyeliner Tips: परफेक्ट आयलाइनर कसं लावायचं? जाणून घ्या 8 सोप्या स्टेप्स

Maharashtra Live News Update : अजितदादा-लांडगेंच्या वादात; देवेंद्र फडणवीसांकडून महेश लांडगेंची पाठराखण

Parenting Tips: सावधान! तुम्ही तुमच्या लहान मुलांसमोर कपडे बदलता का? वाईट सवय तर लावत नाहीत ना?

SCROLL FOR NEXT