punjab Shocking  Saam tv
देश विदेश

Punjab Shocking : पंजाब हादरलं! पहाटेच्या गाढ झोपेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

Punjab Shocking news : पहाटेच्या गाढ झोपेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झालाय. या घटनेने पाच जणांच्या मृत्यूची घटना घडली. मृतांच्या मृतचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

Vishal Gangurde

पंजाब तरनतारनमध्ये झोपेत असताना एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पंडोरी गोला गावात ५ जणांच्या मृत्यूची घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, ५ जणांचा मृत्यू हा अंगावर छत कोसळल्याने मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. मोडकळीस आलेल्या घरात राहत असलेल्या कुटुंबातील सदस्यांवर घराचं छत कोसळलं. त्यानंतर झालेल्या दुर्घटनेत कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला.

घराच्या छतावर भरपूर भार वाढल्याने कोसळल्याची घटना घडली. दुर्घटेनंतर पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये गोविंदा (४० ), त्यांची पत्नी अमरजीत कौर (३६), त्यांचे ३ लहान मुलांचाही मृत्यू झाला. गुरबाज सिंह, गुरलाल, मुलगी एकम यांचाही मृत्यू झाला.

तरतारन पोलिसांच्या माहितीनुसार, घर मोडकळीस आलं होतं. त्यामुळे छतावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि जड वस्तू होत्या. त्यामुळे छतावर भार वाढला. पुढे पावसामुळे छत कोसळलं. यामुळे घरात झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

चंडीगडमध्ये घडली होती दुर्दैवी घटना

चंडीगढच्या सेक्टर १७ मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. चंडीगडातील सेक्टर १७ मधील घर असुरक्षित असल्याची घोषणा केल्यानंतर कोसळल्याची घटना घडली होती. चंडीगडमधील ३ मजली घर असुरक्षित असल्याची घोषणा केल्यानंतर १० दिवसांत कोसळलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घर असुरक्षित असल्याची घोषणा केल्यानंतर २७ डिसेंबर रोजी सील करण्यात आलं होतं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. घर दुरुस्ती केल्याने घर कोसळल्याचे कारण त्यांनी दिलं होतं. घर दुरुस्ती केल्याने घराचे खांब हे खराब झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT