HR Manager Fraud News AI image
देश विदेश

Fraud News : 8 वर्षे, 22 बोगस कर्मचारी...; एक गोष्ट खटकली अन् HR ने केलेला १८ कोटींचा घपला झाला उघड

Fraud HR manager : कंपनीच्या एचआर मॅनेजरनं १८ कोटींचा घोटाळा केलाय. आठ वर्षे तो कंपनीला चुना लावत होता. पण कंपनीच्या वित्त विभागाला एक गोष्ट खटकली आणि घोटाळेबाज एचआरचा भंडाफोड झाला.

Nandkumar Joshi

चीनमधील एका कंपनीला एचआर मॅनेजरनं १८ कोटींचा गंडा घातला आहे. ८ वर्षे तो २२ बोगस कर्मचाऱ्यांच्या नावानं बँक अकाउंटमध्ये सॅलरी जमा करत होता. धक्कादायक म्हणजे हे कर्मचारी कंपनीत कधी दिसलेच नाहीत. कुणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने त्यांची हजेरी तो अपडेट करायचा. या ८ वर्षांत त्यानं या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सॅलरीच्या रुपानं कंपनीला जवळपास १६ मिलियन युआन म्हणजेच १८ कोटी रुपयांचा चुना लावला.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, यांग असं या घोटाळेबाज एचआर मॅनेजरचं नाव आहे. चीनची राजधानी शांघाईमध्ये लेबर सर्व्हिस कंपनीत तो एचआर मॅनेजर म्हणून काम करत होता. एका कंपनीसाठी पुरवलेल्या कामगारांच्या वेतनाची जबाबदारी त्याच्यावर होती.

कर्मचाऱ्यांची नेमणूक ते त्यांचे वेतन या प्रक्रियेत त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीचा हस्तक्षेप नाही, हे यांगच्या लक्षात आलं. याच गोष्टीचा त्यानं गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. त्यानं सन नावाच्या बोगस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. महिनाभरानंतर त्याच्या नावानं पगार काढण्यासाठी अर्ज केला. त्याच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पगाराची रक्कम बोगस बँक खात्यात वळते केले.

यांगनं केलेल्या घपल्याची कुणालाही कुणकुण लागली नाही. त्यामुळं यांगची हिंमत वाढली. २०१४ मध्ये यांगने हळूहळू बोगस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. आठ वर्षांत म्हणजेच २०२२ पर्यंत बोगस कर्मचाऱ्यांची संख्या ही २२ वर पोहोचली. पण २०२२ मध्ये हा घोटाळा समोर आला. पण कर्मचाऱ्यांचं वेतन किती होतं याची माहिती समोर आलेली नाही.

असा उघड झाला घपला

एचआर मॅनेजर यांग हा आठ वर्षे या अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार घेत होता. २०२२ मध्ये कंपनीच्या वित्त विभागाला संशय आला. सन नावाचा कर्मचारी आठ वर्षे काम करत होता, पगार घेत होता. पण त्याला कुणीही कधीच बघितलेलं नव्हतं. कंपनीत त्याचा कुणीही मित्र किंवा जवळचा सहकारी नसल्याचे लक्षात आले. वित्त विभागानं याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी पेरोल रेकॉर्ड आणि बँकेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. त्यावेळी यांगनं केलेला घपला उघड झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT