Dubai Shocking  Saam tv
देश विदेश

Dubai Shocking : दुबईत खळबळ! पाकिस्तानी नागरिकाने घेतला २ भारतीयांचा जीव

Dubai Shocking News : दुबईत खळबळ माजली आहे. पाकिस्तानी नागरिकाने दोन भारतीयांचा जीव घेतल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

दुबईत धक्कादायक घटना घडली आहे. दुबईत तेलंगणातील दोघांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. तर तिसरा गंभीर जखमी झाला आबे. पाकिस्तानी नागरिकाने धारदार शस्त्राने हत्या केली. पाकिस्तानी नागरिकाने मंगळवारी दुबईत बेकरीत काम करणाऱ्या दोघांची हत्या केली. दोघांच्या हत्येने दुबईत खळबळ उडाली आहे.

दुबईत अष्टपु प्रेमसागर आणि श्रीनिवास यांची धारदार शस्त्राने हत्या केली. अष्टपु हा निर्मल जिल्ह्यातील साव गावात रहिवाशी होता. त्याची हत्या झाल्याची माहिती त्याच्या काकाने दिली. दोघे बेकरीत काम करत असताना दोघांची हत्या झाल्याची घटना घडली.

35 वर्षीय अष्टपु प्रेमसागर गेल्या ६ वर्षांपासून बेकरीत काम करत आहे. त्याने त्याच्या कुटुंबाला दोन वर्षांपूर्वी झाली होती. प्रेमसागरला पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याच्या कुटुंबीयांना याबाबत सांगण्यात आलेले नाही. भारत सरकारने मदत करावी, अशी प्रेमसागरच्या नातेवाईकांनी मागणी केली. प्रेमसागरच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं की, श्रीनिवास हे दुसऱ्या मृत व्यक्तीचं नाव आहे. तो निझामाबाद जिल्ह्यातील आहे. तर तिसऱ्या व्यक्तीचं नाव सागर असून आहे. सागरवर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असं त्याची पत्नी भवानी यांनी सांगितलं.

विदेश मंत्रालयाकडे कारवाईची विनंती

या प्रकरणी विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. आपलं गृह मंत्रालय दुबई प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. प्रेमसागरचा भाऊ अष्टपू संदीपने दुबई प्रशासनाशी संवाद साधला. या प्रकरणातील दुबईने मृत भारतीयांचे मृतदेह भारताला सोपवण्यासंदर्भात आश्वासन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT