Haridwar Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार

Haridwar Crime News : हरिद्वारमध्ये जन्मदात्या बापाने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार केले. तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ३०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Alisha Khedekar

  • हरिद्वारमध्ये जन्मदात्या बापाने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार केले.

  • तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

  • याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या

  • पुढील तपास सुरु

हरिद्वारमध्ये वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ११ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या बापाने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर, नराधम बापाने मुलीला मारून टाकण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ केला. पीडित मुलीने बापाच्या या हैवानी कृत्याचे चित्रण केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना हरिद्वारच्या कंखलमध्ये घडली आहे. पीडितेने सांगितले की, ती ८ ते ९ वर्षांची असल्यापासून तिचे वडील तिचं लैंगिक शोषण करत आले आहेत. शिवाय हे कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. तिने अनेकदा कुटुंबाला तसेच इतर नातेवाईकांना सांगण्याचा प्रयत्न केला.

ती वारंवार आजारी पडत होती. मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तिच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पीडितेने सांगितले की सर्वांना तिच्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मुलीने फोनमध्ये वडिलांनी केलेल्या कृत्याचे दृश्य कैद केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

न्यायालयाने या प्रकरणी नराधम बापाला २० वर्षे सक्तमजुरी आणि ३०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

Maharashtra News Live Update: धाराशिवमधील पार्डीत टायरच्या दुकानाला भीषण आग

SCROLL FOR NEXT