प्रियांका यांच्यासोबत जे झालं, ते भाजप पदाधिकारी सोबत झालं असत तर ? राऊतांचा सवाल Saam Tv
देश विदेश

प्रियांका यांच्यासोबत जे झालं, ते भाजप पदाधिकारी सोबत झालं असत तर ? राऊतांचा सवाल

संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन मोदी सरकारवर Central Government जोरदार टीका केली आहे. तसेच प्रियंका गांधींना Priyanka Gandhi ताब्यात घेतल्याचाही त्यांनी निषेध केला आहे.

हे देखील पहा -

यावेळी राऊत म्हणाले की, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचं राजकीय वैर असू शकतात, काँग्रेससोबत शकतात, पण त्यांचा गुन्हा काय? कोणत्याही वॉरंटशिवाय त्यांना ताब्यात का घेतलं? त्या इंदिरा गांधी यांच्या नात आहे, त्या एक महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलीस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते. प्रियांका यांच्यासोबत जे झालं, ते भाजप पदाधिकारी सोबत झालं असत तर ? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

लखीमपूर दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे. हा एका राज्याचा विषय नाही, अन्यायासाठी लढणाऱ्यांना असे केले जात असेल तर हे धोकादायक आहे. ही भारत पाकिस्तान लढाई आहेका ? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अशी घटना महाराष्ट्र, केरळ, राजस्थान मध्ये झाली असती तर भाजप रस्त्यावर उतरली असती. पण आज शेतकऱ्यांचे दुःख समजावून घ्यायला पण तिथं कुणाला जाऊ दिल जातं नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CCTV Video : भावजय नगरसेवक कशी झाली? विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला, बीड पुन्हा हादरले

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सतेज पाटील यांना अल्टीमेटम

Shocking : मुख्यध्यापकांच्या जाचाला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या; शाळेच्या आवारात संपवलं जीवन

Punha Ekda Sade Made Teen: नाताळची खास भेट! ‘कुरळे ब्रदर्स’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'ची तारीख जाहीर

Student Scholarship: या विद्यार्थ्यांना मिळणार १२००० रुपयांची स्कॉलरशिप; काय आहे योजना?

SCROLL FOR NEXT