Chatrapati Shivaji Maharaj SaamTv
देश विदेश

Shivjayanti 2023: आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा; राज्य सरकार सहआयोजक होणार

आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार सहआयोजक होण्यात तयार झालं आहे.

Shivaji Kale

Shivjayanti 2023: आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार सहआयोजक होण्यात तयार झालं आहे. त्यामुळे आग्रा किल्यावर दिमाखात शिवजयंती साजरी होणार आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकार सहआयोजक असेल तर आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करायला परवानगी द्यावी. राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला पत्र दिले तर परवानगी मिळेल, असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील सहआयोजक होण्यास तयार झालं आहे.

आर. आर. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र पुरातत्व खात्याने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयाने राज्य सरकार (Maharashtra Government) सहआयोजक असेल तर परवानगी मिळेल असे म्हटले होते.

दरम्यान पुरातत्व खात्याने स्पष्ट केले होते की 'परवानगी देण्याचे सर्व अधिकार महासंचालकांचे आहेत. खासगी कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही असा नियम आहे. कार्यक्रमासाठी परवानगी हवी असेल तर राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा'.

या प्रकरणावर सुनावणीदरम्यान हायकोर्ट म्हणाले होते, 'राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही. त्यासाठी राज्य सरकारकडून उत्तर प्रदेश सरकारला पत्र जाणे आवश्यक आहे. त्यानंतरही पुरातत्व खात्याने परवानगी दिली नाही तर मग पुन्हा आयोजकांना कोर्टाचे दरवाजे खुले आहेत'.

दरम्यान, राज्य सरकार सहआयोजक होण्यास तयार झाल्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंद पसरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT