Shiv Sena Supreme Court Case saam tv
देश विदेश

Shiv Sena Case live: शिंदे की ठाकरे, शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टात काय घडलं? वाचा A टू Z अपडेट

Supreme Court On Shiv Sena Case: सुप्रीम कोर्टात आज शिवसेना चिन्ह आणि पक्ष कुणाचे यावर सुनावणी पार पडली. शिवसेना शिंदेसेनेच्या बाजूने वकील नीरज कौल यांनी युक्तीवाद केला.

Priya More

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गटाने २०२४ मध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी कोर्टात युक्तीवाद केला होता. आता शिंदेसेनेचे वकील नीरज कौल हे शिंदेसेनेची बाजू मांडत कोर्टात युक्तीवाद करत आहेत.

आजच्या सुनावणीदरम्यान नीरज कौल यांनी युक्तीवाद केला की, 'आधी फूट आणि नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही. ठाकरे त्यांचे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत.' आजची सुनावणी संपली असून उद्या आणि परवा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत...

शिंदेंच्या शिवसेनेचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद करताना सांगितले की, ठाकरे त्यांचं बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जायची तयारी दर्शवली नाही. या सुनावणीदरम्यान नीरज कौल यांनी अनेक केसेसचे दाखले दिले. त्यांनी सुरुवातीला राणा केस, नंतर सुभाष देसाई केसचा दाखला दिला. राणा केसचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, अपात्रतेचा निर्णय हा अपात्रता याचिका दाखल केलेल्या तारखेच्या परिस्थितीवर आधारित असावा. आधी फूट आणि नंतर अपात्रता असा क्रम लावता येणार नाही. राणा केसचा चुकीचा अर्थ लावला गेला. ठाकरेसेनेने बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली नसल्याचा युक्तीवाद नीरज कौल यांनी कोर्टात केला.

या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी दोन्ही शिवसेना पक्षाला सवाल केला की, अपात्र सदस्य पक्षातून बाहेर गेल्यास आणि उर्वरित सदस्यांना वेगळे चिन्ह मिळाल्यास मूळ पक्षचिन्हाचा अधिकार नेमका कुणाला मिळावा? यासोबत त्यांनी आणखी एक सवाल उपस्थित केला की, 'ज्यांनी घटनात्मक पाप केले आहे त्यांच्यासाठी पक्षचिन्हाचे महत्व लागू होते की, ज्यांनी त्या पापाविरोधात तक्रार केली त्यांच्यासाठी पक्षचिन्हाचे महत्व लागू होते?'

यासोबतच, 'पक्षात नेमके बहुमत कुणाकडे आहे हे ठरवणे अत्यंत जाणकार अशा निवडणूक आयोगाला देखील कठीण आहे.', असे मत न्यायमूर्ती बागची यांनी व्यक्त केले. यावेळी, कोर्टाने शिंदेसेनेलाच विचारणा केली की, 'तळागाळातील कार्यकर्त्यांची संख्या मोजून लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे जवळपास अशक्य असल्याचे बहुमत कसे ठरवणार? संघटनात्मक चाचणी घेताना पक्षाची अंतर्गत रचना जर अलोकशाही स्वरूपाची असेल तर त्या रचनेतून पक्षाला प्रत्यक्ष तळागाळात किती जनसमर्थन आहे हे स्पष्टपणे दिसते का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सासू सासऱ्यांचे घर, जमीन, मालमत्ता सुनेला मिळू शकते का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या

Rajgira Benefits : फक्त उपवासालाच नाही! सलग १४ दिवस राजगिरा खाऊन पाहा; आरोग्याला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

सलग ३० दिवस चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने त्वचेवर होतात हे चमत्कारिक बदल!

Women health problems: लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव, सतत वेदना? महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष का करू नये, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra News Live Update: एमडी ड्रग्स विकणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT