SHIV SENA SUPREME COURT HEARING: THACKERAY VS SHINDE, 10 KEY POINTS saam tv
देश विदेश

पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना कुणाची? सुनावणी लांबणीवर; २३ नोव्हेंबरला होणार युक्तिवाद

Supreme Court Shiv Sena hearing date : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सुनावणी होऊ शकली नाही. आता संगणकीय प्रणालीनुसार २३ नोव्हेंबर २०२६ ही पुढील संभाव्य तारीख समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

Shiv Sena disqualification case latest news : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील बहुचर्चित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी भारताचे सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या पीठासमोर ही केस सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी ही सुनावणी होऊ शकली नाही. आता संगणकीय प्रणालीनुसार (कम्प्युटर जनरेटेड) या प्रकरणाची पुढील संभाव्य सुनावणी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदार अपात्रतेचा हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली असून, यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना (शिंदे गट) मधील इतर आमदार प्रतिवादी आहेत. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ आणि संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार (पक्षंतरबंदी कायदा) आमदारांच्या अपात्रतेचा हा मुद्दा आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या या महत्त्वाच्या प्रकरणाच्या नवीन तारखेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Supreme Court Shiv Sena hearing date

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असून बंडखोर आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य असल्याने सर्वोच्च न्यायालयानेच शिंदे गटाच्या आमदारांना थेट अपात्र ठरवून 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवावे, असा युक्तिवाद ठाकरेंकडून करण्यात आला.

शिंदेंकडून याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की, हा पक्षांतराचा (Defection) विषय नसून पक्षांतर्गत लोकशाही आणि बहुमताचा अधिकार (Intra-party dissent) आहे, तसेच आमदारांनी मूळ पक्ष सोडलेला नसून केवळ नेतृत्वावर अविश्वास दाखवून नवीन गटनेता निवडला आहे; त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने थेट अपात्रतेचा निर्णय न देता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आणि मूळ कार्यपद्धतीचा आदर केला पाहिजे.

जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय नाट्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानत त्यांच्या आमदारांवरील अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.

अध्यक्षांच्या या निर्णयाला ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे (SLP) आव्हान दिले आहे. या याचिकेत लोकप्रतिनिधी कायदा १९५१ आणि संविधानाच्या १० व्या अनुसूचीतील (पक्षंतरबंदी कायदा) तरतुदींच्या आधारे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदेंना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले गेले, त्यालाही ठाकरेंकडून कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Famous Actress : गुडन्यूज! प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म; नाव काय?

Gauri Kulkarni: ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचं लिंबू रंगाच्या साडीतील बोल्ड फोटोशूट

Handkerchief Hygiene : खिशातला रूमाल गंभीर आजारांचे घर; किती दिवसांत बदलला पाहिजे वापरलेला रूमाल? जाणून घ्या

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, संपर्कप्रमुखांनी धनुष्यबाण सोडला; शेकडो कार्यकर्त्यांसह केली घरवापसी

SCROLL FOR NEXT