Delhi Farmer Protest Saam TV
देश विदेश

Breaking News: शेतकरी आंदोलन पुन्हा चिघळलं, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; धुमश्चक्रीत ५८ जण जखमी

Satish Daud

Delhi Farmer Protest News in Marathi

केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावत हजारो शेतकऱ्यांनी बुधवारी (२१ फेब्रुवारी) राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी हरियाणातील शंभू सीमेजवळ सरकारविरोधात एकवटले. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमा पार करण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या तसेच रबरी गोळ्या झाडल्या. या कारवाईत एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय ५८ शेतकरी आणि १२ पोलीस जखमी झाले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून शेतकरी आंदोलन दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

पिकांना हमीभाव मिळावा, तसेच शेतीकर्ज माफ करावे यासह विविध मागणीसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारत चलो दिल्लीचा नारा दिला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी सुरू असून आंदोलन दडपण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये तब्बल ४ वेळा बैठका झाल्या आहेत.

मात्र, या बैठकीतून अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्रासोबत रविवारी (१८ फेब्रुवारी) चौथ्या बैठकीतील चर्चा फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी बुधवारपासून (२१ फेब्रुवारी) पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केली. यावेळी जेसीबी, पोकलेन मशीन घेऊन शेतकरी हरियाणातील शंभू सीमेजवळ पोहचले.

पोलिसांनी शेतकऱ्यांनी सीमा पार करण्यापासून रोखले असता, दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत रबरी गोळ्या झाडल्या. या कारवाईत तब्बल ५८ शेतकरी जखमी झाले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय १२ पोलीस देखील जखमी झाले आहेत. शंभू सीमेवरील तणाव बघता शेतकऱ्यांनी आंदोलन दोन दिवस पुढे ढकललं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : काल पर्यंत कडू होत...निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉस घरात नेमकं चाललंय काय?

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT