Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Tv
देश विदेश

NCP Crisis: शरद पवार गटाने तयारीसाठी मागितला वेळ, अजित पवार गटाचा विरोध; आज सुनावणीत काय घडलं?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: शरद पवार गटाने तयारीसाठी मागितला वेळ, अजित पवार गटाचा विरोध; आज सुनावणीत काय घडलं?

Satish Kengar

Sharad Pawar Vs Ajit Pawar:

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हांबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आपली बाजू मांडण्यात आली. आजच्या सुनावणीदरम्यान शरद पवार गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितली,

यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आज सुनावणीत काय घडलं?

आज अजित पवार गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात करताना म्हटले आहे की, पक्षावर कोणतीही व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही. कोणताही एक व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही, सध्या पक्षामध्ये हीच स्थिती आहे. (Latest Marathi News)

ते म्हणाले आहेत की, मुद्दा हा आहे की, जो व्यक्ती पक्ष चालवतो तो व्यक्ती निवडून आलेला नाही. त्या व्यक्तीला वैध कसं म्हणता येईल. असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर सवाल उपस्थित केले आहेत.

अजित पवारांनी दिलेल्या उत्तरात बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सामिल झाला असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. पण हा आकडा किती आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असा युक्तिवाद आज शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT