Sharad Pawar On MVA Saam Digital
देश विदेश

Maharashtra Loksabha Election : महाविकास आघाडीतील कोणता पक्ष, कुठून लढणार? शरद पवारांनी थेट माहितीच दिली

Mahavikas Aghadi/ Lok Sabha Seat Allocation : शरद पवार यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यात शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांना सोबत घेवून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Sandeep Gawade

Sharad Pawar On MVA

लोकसभा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रस्तावावर अडून बसली आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.

जास्तीत जास्त ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न राहीलं. राज्यात शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांना घेवून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. एक दोन जागांचा तिढा आहे, त्या पार्श्वभूमीनर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे यांच्या पक्षाला काही जागा सोडण्यासांदर्भात विचार सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत यावं ही आमची इच्छा आहे. त्यांच्या तक्रारी असतील, तर त्या सामंजस्याने सोडवल्या जातील. प्रकाश आंबेडकर यांना जागा सोडण्याबाबत माझ्यासमोर चर्चा झाली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे जे मुद्दे मांडले त्यात घराणेशाहीचा मुद्दा नाही. नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिंडोरीची जागा शरद पवार गटाकडे

नाशिकच्या जागेसाठी माझ्या पक्षातील लोक देखील इच्छुक आहेत, त्यात वावग काही नाही. मात्र मी त्यांना समजावून सांगितलं. दिंडोरीची जागा आमच्याकडे (राष्ट्रवादी शरद पवार गट) राहणार आहे. माकपसाठी विधानसभेसाठी जागा सोडण्याची तयारी आहे, मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून आम्हाला मदत केली पाहिजे. शिक्षक भास्कर भगरे शरद पवार गटाचे दिंडोरीचे उमेदवार असावेत, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

विजय शिवतारे लढले तरी परिणाम होणार नाही

विजय शिवतारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा कोणावर आणि किती परिणाम होईल हे निवडणुकीत दिसेलच. मात्र महा विकास आघाडीवर मात्र परिणाम होणार नसल्याचं ते म्हणाले.

सर्वच घटक सरकारवर नाराज

राज्यातील जनतेचा कल महाविकास आघाडीच्या आजून आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. सत्ताधाऱ्यांवर कांदा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी आहे. बेरोजगारी, महागाई यामुळे मध्यमवर्ग आणि तरुण पिढी देखील अस्वस्थ असल्याचं चित्र आहे आणि याचा परिणाम येत्यां निवडणुकांमध्ये दिसेल.

ED च्या कारवाईत एकही भाजप नेता नाही

केद्र सरकारने ED, CBI सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांच्या विरोधात केला. मागील १७ वर्षात ५ हजारांहून अधिक केसेस दाखल केल्या आहेत. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १२१ लोकांची ED ने चौकशी केली, त्यापैकी ११५ लोक विरोधी पक्षातील होते. मात्र ED कडून झालेल्या कारवाईत एकही भाजप नेत्याचा समावेश नाही. तर दुसरीकडे ज्यांच्यामागे ED ची चौकशी लागली ते भाजपमध्ये गेलेल्या हसन मुश्रीफ आणि अन्य नेत्यांवरिल कारवाया थांबल्या आहेत. आम्ही सत्तेत असताना विरोधकांवर सत्तेचा गैरवापर न करता काम केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT