Sharad Pawar Group Symbol New Symbol Saam Digital
देश विदेश

Sharad Pawar Speech : शेतातील तण उपसून फेकतात, तसं शेतकरी मोदी सरकारला सत्तेतून उपसून टाकतील : शरद पवार

Sharad Pawar Speech : मोदी सरकार त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. त्यामुळे शेतातील तण जसे उपटून फेकतो, तसे शेतकरी सत्तेतून उपसून टाकतील, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Sharad Pawar News:

शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मोदी सरकार त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. त्यामुळे शेतातील तण जसे उपसून फेकतो, तसे शेतकरी सत्तेतून उपसून टाकतील, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. (Latest Marathi News)

महाविकास आघाडी पहिला जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पुण्यात पार पडत आहे. हा मेळावा पुण्यातील काँग्रेस भवनाच्या प्रांगणात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शरद पवार यांचा सत्कार काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. या कार्यक्रमात शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

१. आज ऐतिहासिक मेळावा आहे. महाराष्ट्र आणि देशात जे परिवर्तन करायचं आहे. त्याची तयारी काँग्रेस भवन या मेळाव्यातून करतोय. देशात सामाजिक ऐक्य बिघडेल अशी अशी स्थिती आहे. आज पंतप्रधान मोदी यांचा जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. हे राज्यकर्ते सामान्य लोकांची हिताचे काम करणार नाहीत.

२. अन्नदाता आत्महत्या करत असेल तर त्याची कारणे शोधली पाहिजे. पंतप्रधान आणि कृषिमंत्री यांनी जाणून घेतली पाहिजे. त्यावेळी मी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला भेट घेतली.

३. आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांचे कर्ज कमी होत नाही, तोपर्यंत आत्महत्या कमी होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील ७० हजार कोटी कर्ज कमी केलं. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण सरकार लक्ष देत नाही. शेतकरी आज संकटात आहे.

४. आज मोदी गॅरंटी काय? गॅरंटी म्हणून अनेक आश्वसने दिली पण ती पूर्ण केली नाही. जवाहलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी राज्य आणि केंद्राचा समन्वय साधला. आजचे राज्यकर्ते असं करताना दिसत नाही. मनमोहन सिंह मुख्यमंत्र्यांचा सन्मान करत होते. मात्र पंतप्रधान मोदी सहकार्य करत नाहीत.

५. पंतप्रधान मोदी यांनी भोपाळमध्ये सांगितले की, एनसीपी भ्रष्टाचारी पक्ष आहे. आजही माझं आव्हान आहे की बँक इरिगेशन भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करावी. देशासमोर सत्य स्थिती ठेवावी. मात्र हे राज्यकर्ते करणार नाहीत.

६. राज्यकर्ते झारखंड दिल्ली मुख्यमंत्री यांना अटक करते आहे. सत्तेचा वापर विरोधकाना तुरुंगात टाकले जातं आहे. देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ईडी, सीबीआय, आयटी याचा वापर केला जात आहे. अटक करणे, खटले भरणे, निवडणूक अधिकारांवर घाव घालण्याचा प्रयत्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी शिर्डीकरांकडून मदतीचा हात

१.८६ लाखांचा मोबाईल ऑर्डर केला, बॉक्स उघडताच इंजिनिअरच्या पायाखालची जमीन सरकली ; पाहा VIDEO

Dharashiv : 'जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही', लहुजी शक्ती सेनेचा इशारा | VIDEO

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने नंदुरबारमध्ये शेतकरी संतप्त

Pune Tourism : वीकेंडला करा फॅमिली ट्रिप, पुण्याजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

SCROLL FOR NEXT